World Cup : भारताला मोठा धक्का, शिखर धवन वर्ल्ड कपमधून बाहेर

World Cup : भारताला मोठा धक्का, शिखर धवन वर्ल्ड कपमधून बाहेर

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात शिखर धवननं 117 धावांची शतकी खेळी केली होती

  • Share this:

लंडन, 11 जून : ICC Cricket World Cupमध्ये भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. भारताचा धडाकेबाज सलामीवीर शिखर धवन तीन आठवड्यांसाठी संघाबाहेर गेला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शिखर धवनच्या उजव्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळं क्षेत्ररक्षण करताना शिखर मैदानावर दिसला नाही. दरम्यान त्याची दुखापत स्कॅन करण्यात आली असून, त्याच्या अंगठ्याला सूज आल्याचे यात निष्पण्ण झाले आहे. धवनच्या दुखापतीवर चर्चा करुन फिजीओ पैट्रीक फरहार्ट यांनी तीन आठवड्यांसाठी धवन खेळणार नसल्याचे सांगितले आहे. ऑस्ट्रेलियाविरोधा झालेल्या सामन्यात फलंदाजी करत असताना जलद गोलंदाज कुल्टर नाईलचा चेंडू धवनच्या अंगठ्याला लागला होता.त्यामुळं त्याला दुसऱ्या इनिंगमध्ये क्षेत्ररक्षण करता आले नाही. त्याच्या जागी रविंद्र जडेजाने क्षेत्ररक्षण केले.

धवनने लगावले 17वे शतक

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात शिखर धवननं 117 धावांची शतकी खेळी केली. आयसीसी टुर्नामेंटमधले धवनचे हे 6वे शतक आहे तर, वर्ल्ड कपमधले तीसरे शतक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध धवनचे हे चौथे शतक आहे.

धवन खेळला नाही तर, कोणाला मिळणार संधी

धवनच्या अंगठ्याला दुखापत झाल्यामुळं तो खेळू शकणार नाही. त्यामुळं आता विजय शंकरची संघात वर्णी लागू शकते. केएल राहुल आणि रोहित शर्मा सलामीसाठी येऊ शकतात आणि विजय शंकर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरु शकतो.

वाचा-विराटची चिंता वाढली, धडाकेबाज सलामीवीर पुढच्या सामन्याला मुकणार?

वाचा- अखेर पावसामुळं दक्षिण आफ्रिकेनं उघडले खाते, भारत तिसऱ्या क्रमांकावर

वाचा- भारत-पाक सामन्याबद्दल अख्तरची भविष्यवाणी, हा संघ आहे फेवरेट

पूर्वमोसमी पावसामुळे मुंबईत विमानसेवा विस्कळीत, महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या

First published: June 11, 2019, 1:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading