मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs Zim: झिम्बाब्वेला कमी लेखणार नाही, कारण... पाहा पहिल्या वन डेआधी काय म्हणाला शिखर धवन?

Ind vs Zim: झिम्बाब्वेला कमी लेखणार नाही, कारण... पाहा पहिल्या वन डेआधी काय म्हणाला शिखर धवन?

शिखर धवन, उपकर्णधार, टीम इंडिया

शिखर धवन, उपकर्णधार, टीम इंडिया

Ind vs Zim: या मालिकेआधी झिम्बाब्वेनं बांगलादेशला वन डे आणि टी20त 2-1 अशा फरकानं हरवलं आहे. झिम्बाब्वे सध्या चांगलं क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे या संघाला कमी लेखणार नसल्याचं धवननं म्हटलंय.

  • Published by:  Siddhesh Kanase
हरारे, 16 ऑगस्ट: भारत आणि झिम्बाब्वे संघातल्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेतील पहिला सामना येत्या गुरुवारी होणार आहे. या सामन्यासाठी लोकेश राहुलची टीम इंडिया सज्ज झाली आहे. त्याआधी आज झालेल्या पत्रकार परिषदेत उपकर्णधार शिखर धवननं झिम्बाब्वेचं आव्हान सोपं नसल्याचं म्हटलं आहे. गेल्या काही सामन्यात झिम्बाब्वेनं दमदार कामगिरी बजावली आहे. त्यामुळे या संघाला कमी लेखणार नसल्याचं धवननं म्हटलंय. या मालिकेआधी झिम्बाब्वेनं बांगलादेशला वन डे आणि टी20त 2-1 अशा फरकानं हरवलं आहे. “झिम्बाब्वे सध्या चांगलं क्रिकेट खेळत आहे.  त्यामुळे आमच्यासाठीही ही बाब चांगली आहे.’’ असंही धवननं म्हटलंय. राहुलचं कमबॅक “लोकेश राहुलचं संघात परतलाय ही खूप चांगली गोष्ट आहे. तो या मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार असेल. भारतीय संघातला तो एक महत्वाचा सदस्य आहे. आणि आशिया चषकाच्या पार्श्वभूमीवर ही मालिका त्याच्यासाठी फायद्याची ठरावी. मला विश्वास आहे की या मालिकेत तो चांगलं प्रदर्शन करेल.’’ असा विश्वास धवननं व्यक्त केलाय. दरम्यान वॉशिंग्टन सुंदरला दुखापतीमुळे मालिकेच्या सुरुवातीआधीच संघाबाहेर जावं लागलं आहे. तो लवकरच या दुखापतीतून सावरेल असं धवननं म्हटलंय. सुंदरच्या जागी बंगालच्या शाहबाज अहमदचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. युवा शिलेदारांसाठी संधी भारतीय संघातल्या शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, ईशान किशनसारख्या युवा खेळाडूंना ही चांगली संधी असल्याचं भारतीय उपकर्णधाराला वाटतं. या खेळाडूंकडे खेळाचं चांगलं तंत्र आहे. डोमेस्टिक क्रिकेट आणि आयपीएलमुळे त्यांचा आत्नविश्वास उंचावलाय. त्यामुळे टीम इंडियाकडेही चांगले पर्याय तयार होत असल्याचं मतही धवननं व्यक्त केलंय. हेही वाचा - Asia Cup 2022: विराटची बॅट पुन्हा तळपणार? पाहा आशिया चषकातला ‘विराट’ परफॉर्मन्स भारत-झिम्बाब्वे वन डे मालिका 18 ऑगस्ट – पहिली वन डे, हरारे स्पोर्टस क्लब 20 ऑगस्ट – दुसरी वन डे, हरारे स्पोर्टस क्लब 22 ऑगस्ट – तिसरी वन डे, हरारे स्पोर्टस क्लब मालिकेतले तिन्ही सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 12.45 वा. सुरु होतील भारतीय संघ – लोकेश राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, ईशान किशन, संजू सॅमसन, शाहबाज अहमद, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर
First published:

Tags: Shikhar dhawan, Sports, Team india

पुढील बातम्या