मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /घटस्फोटानंतर धवन मुलगा जोरावरसोबत बोलला, बाप-मुलाचा इमोशनल VIDEO Call

घटस्फोटानंतर धवन मुलगा जोरावरसोबत बोलला, बाप-मुलाचा इमोशनल VIDEO Call

शिखर धवनसाठी (Shikhar Dhawan) मागचा संपूर्ण आठवडा आयुष्यातले उतार घेऊन आला. शिखर धवनची माजी पत्नी आयशा मुखर्जीने (Ayesha Mukherjee) घटस्फोट घेतल्याचं सांगितलं. यानंतर लगेचच टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या (T20 World Cup Team India) भारतीय टीममध्ये शिखर धवनची निवड झाली नाही.

पुढे वाचा ...

मुंबई, 14 सप्टेंबर : शिखर धवनसाठी (Shikhar Dhawan) मागचा संपूर्ण आठवडा आयुष्यातले उतार घेऊन आला. शिखर धवनची माजी पत्नी आयशा मुखर्जीने (Ayesha Mukherjee) घटस्फोट घेतल्याचं सांगितलं. यानंतर लगेचच टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या (T20 World Cup Team India) भारतीय टीममध्ये शिखर धवनची निवड झाली नाही. आता शिखर धवन युएईमध्ये आयपीएल (IPL 2021) खेळण्यासाठी गेला आहे. धवन आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा ओपनर आहे. घटस्फोट आणि टीम इंडियामध्ये स्थान न मिळाल्यानंतरही धवन निराश नाही. त्याने आपला मुलगा जोरावर (Zoravar) याच्यासोबत व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला.

शिखर धवनने युएईमधून आपला मुलगा जोरावरला व्हिडिओ कॉल केला. जोरावरसोबतच्या व्हिडिओ कॉलचा एक फोटो शिखरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेयर केला. या फोटोमध्ये दोघं एकमेकांना किस करताना दिसत आहेत. माझ्या दिवसाचा सगळ्यात खास भाग, असं कॅप्शन धवनने या फोटोला दिलं आहे.

शिखर धवन सोशल मीडिया अकाऊंटवरून पत्नी, मुलगा आणि मुलींचे फोटो शेयर करायचा, पण यावर्षाच्या सुरुवातीपासूनच तो सोशल मीडियावर एकटाच दिसत होता. 2-3 वेळा त्याने जोरावर सोबतचा फोटो टाकला पण पत्नी आयशा आणि मुलींसोबतचे फोटो त्याने शेयर केले नाहीत. काही दिवसांपूर्वी धवनची पत्नी आयशाने इन्स्टाग्रामवर एक मोठी पोस्ट लिहिली आणि घटस्फोटाबाबत सांगितलं. जोरावर सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आयशासोबत राहत आहे.

घटस्फोट आणि टी-20 वर्ल्ड कप टीममधून बाहेर झाल्यानंतर शिखर धवनने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण त्याने इन्स्टाग्रामवर एक संदेश लिहिला होता. चाहत्यांनी त्याचा हा संदेश घटस्फोट आणि टी-20 वर्ल्ड कप टीममध्ये स्थान न मिळण्याशी जोडला. धवनने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये एक फोटो शेयर केला. हसत राहा, कारण हीच तुमची सगळ्यात मोठी ताकद आहे, असं कॅप्शन धवनने या फोटोला दिलं.

आयशा मुखर्जीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेयर करत घटस्फोटाची माहिती दिली. 'घटस्फोट हा घाणेरडा शब्द आहे, असं मी समजत होते, जोपर्यंत मी दोनवेळा घटस्फोट घेतला नाही. एकदा घटस्फोट झाला त्यानंतर दुसऱ्यांदा खूप काही सिद्ध करायचं होतं. दुसरं लग्न तुटलं तेव्हा हे माझ्यासाठी खूपच भीतीदायक होतं. घटस्फोट खराब शब्द आहे, असा विचार मी करायचे, पण माझा दोनवेळा घटस्फोट झाला. पहिल्यांदा घटस्फोट झाला तेव्हा मी खूप घाबरले होते. मला वाटलं मी अपयशी झाले,' असं आयशा महणाली.

'मला वाटलं मी सगळ्यांना कमी दाखवलं, स्वार्थी असल्यासारखंही वाटलं. मी आई-वडिलांना निराश करत आहे, आपल्या मुलांना कमी दाखवत आहे. देवालाही मी अपमानित केलं, अशा भावना मनात आल्या,' अशी इमोशनल पोस्ट आयशाने लिहिली.

First published:
top videos

    Tags: IPL 2021, Shikhar dhawan, T20 world cup