शिखर धवन ठरला 'हा' विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू!

शिखर धवन ठरला 'हा' विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू!

हा विक्रम करणारा तो पहिला भारतीय तर जगातला 9वा फलंदाज ठरला आहे.

  • Share this:

11 फेब्रुवारी: जोहान्सबर्ग वनडेमध्ये शतक ठोकून शिखर धवनने एक नवाच विक्रम केला आहे. हा विक्रम करणारा तो पहिला भारतीय तर जगातला 9वा फलंदाज ठरला आहे.

जोहान्सबर्गला भारत आणि दक्षिणा आफ्रिकेमध्ये झालेला एकदिवसीय सामना हा शिखर धवनचा 100वा वनडे सामना होता. आतापर्यंत आपल्या 100व्या वनडे सामन्यात एकाही भारतीय खेळाडूला शतक ठोकता आलं नव्हतं. हा करिश्मा शिखर धवनने करून दाखवला आहे.याआधी आपल्या शंभराव्या क्रिकेट सामन्यात सौरव गांगुलीने  97 धावा केल्या होत्या. तर शिखर धवनने 109 धावा केल्या आहेत. आपल्या 100 वनडे सामन्यात शिखर धवनने 13 शतकं  ठोेकली आहेत.

शिखर धवनच्या आधी फक्त आठ  फलंदाजांनी आपल्या शंभराव्या सामन्यात शतक ठोकलं होतं. गॉर्डन ग्रिनीज हा आपल्या शंभराव्या सामन्यात शतक ठोकणारा पहिला फलंदाज होता.  पाकिस्तानच्य विरूद्ध त्याने 102 धावा केल्या होत्या. त्यानंतर न्यूझीलंडचा क्रिस केन,श्रीलंकेच्या  कुमार सांगाकारा , वेस्ट इंडिडच्या ख्रिस गेल , पाकिस्तानच्या मुहम्मद युसुफ , वेस्ट इंडिजच्याच रामनरेश सरवन , इंग्लडच्या मार्कस ट्रेस्कोथिक आणि ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर यांनीच हा विक्रम केला आहे.

First published: February 11, 2018, 5:23 PM IST

ताज्या बातम्या