मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs NZ ODI: आधी घेतली विल्यमसनची शाळा, मग बॉलर्सचा समाचार; पहिल्या वन डेत पाहा 'गब्बर'ची धमाल

Ind vs NZ ODI: आधी घेतली विल्यमसनची शाळा, मग बॉलर्सचा समाचार; पहिल्या वन डेत पाहा 'गब्बर'ची धमाल

शिखर धवनची पहिल्या वन डेत धमाल

शिखर धवनची पहिल्या वन डेत धमाल

Ind vs NZ ODI: टीम इंडियाचा कॅप्टन गब्बर अर्थात शिखर धवननं मॅचच्या सुरुवातीलाच किवी कॅप्टन विल्यमसनची गंमत केली. त्यानंतर त्यानं बॅटिंगमध्येही आपला हिसका दाखवला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

ऑकलंड, 25 नोव्हेंबर: भारत आणि न्यूझीलंड संघातल्या वन डे मालिकेला आजपासून सुरुवात झाली. ऑकलंडच्या पहिल्याच वन डेत न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसननं टॉस जिंकून भारताला बॅटिंगचं आमंत्रण दिलं. त्यानंतर टीम इंडियानं किवी आक्रमणासमोर दमदार फलंदाजी केली. दरम्यान टीम इंडियाचा कॅप्टन गब्बर अर्थात शिखर धवननं मॅचच्या सुरुवातीलाच किवी कॅप्टन विल्यमसनची गंमत केली. त्यानंतर त्यानं बॅटिंगमध्येही आपला हिसका दाखवला.

टॉसवेळी पाहा काय घडलं?

मॅच सुरु होण्याआधी दोन्ही कॅप्टन टॉससाठी मैदानात आले तेव्हा विल्यमसननं टॉस उडवला. कौल विल्यमसनच्या बाजूनं लागला. पण शिखर धवननं विल्यमसनला शेक हॅंड देत जणू तोच टॉस जिंकला असं दाखवत कॉमेंटेटरच्या दिशेनं जात होता. पण त्यानंतर हसत हसतच त्यानं विल्यमसनला पुढे जाण्यास सांगितलं. काही वेळासाठी विल्यमसनच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते. पण त्याला कळून चुकलं की धवननं त्याची शाळा घेतली होती.

View this post on Instagram

A post shared by BLACKCAPS (@blackcapsnz)

धवनची दमदार बॅटिंग

टॉस हरल्यानंतर धवननं युवा शुबमन गिलसह टीम इंडियाच्या डावाची सुरुवात केली. त्यानं सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये किवी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. गिलनंही धवनला चांगली साथ दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 124 धावांची भागीदारी साकारली. या दोघांनी केलेली आजवरची ही चौथी शतकी भागीदारी ठरली. शुबमन गिल पहिल्या विकेटच्या रुपात 50 धावा काढून बाद झाला.

हेही वाचा - Ind vs NZ: फॅन्स खुश हुए...! 'या' दोन खेळाडूंना अखेर टीम इंडियात संधी, सोशल मीडियात चाहत्यांचं सेलिब्रेशन

शतकाची संधी हुकली

धवननं ऑकलंड वन डेत 39वं वन डे शतक झळकावलं. पण शतक झळकावण्याची संधी मात्र हुकली. टीम साऊदीच्या बॉलिंगवर धवन 72 धावा करुन बाद झाला. पण याच मॅचमध्ये त्यानं लिस्ट ए करिअरमधील 12 हजार धावांचा टप्पा पार केला.

First published:

Tags: Cricket, Cricket news, Shikhar dhawan, Sports, Team india