शिखर धवनने शेयर केला फोटो, पण कारवाई झाली बोट चालकावर

शिखर धवनने शेयर केला फोटो, पण कारवाई झाली बोट चालकावर

टीम इंडियाचा ओपनर शिखर धवन (Shikhar Dhawan) हा त्याच्या एका फोटोमुळे चांगलाच अडचणीत आला आहे. बोटीमध्ये बसलेला शिखर धवन पक्षांना दाणे देतानाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • Share this:

वाराणसी, 25 जानेवारी : टीम इंडियाचा ओपनर शिखर धवन (Shikhar Dhawan) हा त्याच्या एका फोटोमुळे चांगलाच अडचणीत आला आहे. बोटीमध्ये बसलेला शिखर धवन पक्षांना दाणे देतानाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 19 जानेवारीला शिखर वाराणसीला गेला होता. तिकडे बोटीमध्ये बसून शिखर पक्षांना खायला देत होता. याप्रकरणी पोलिसांनी नाविक प्रदीप साहनी याच्यावर तीन दिवस बोट चालवायला पोलिसांनी बंदी घातली आहे.

बर्ड फ्लूच्या धोक्यामुळे जिल्हा प्रशासनाने पक्षांना दाणे खायला देण्यावर बंदी घातली आहे. पण शिखर धवनचा हा फोटो व्हायरल झाल्यामुळे जिल्हाधिकारी कौशल राज शर्मा यांनी चौकशीला सुरूवात केली. या चौकशीनंतर नाविकावर कारवाई करण्यात आली. शिखर धवन यानेच इन्स्टाग्रामवरून हा फोटो शेयर केला. पक्षांना खायला देण्यात आनंद मिळतो, असं कॅप्शन शिखर धवनने या फोटोला दिलं होतं.

वाराणसीला गेलेल्या शिखर धवनने बाबा विश्वनाथ यांचं दर्शन घेतलं आणि गंगा आरतीही केली. कोणीही ओळखू नये म्हणून शिखर धवनने तोंडावर मास्क लावलं आणि शाल ओढून घेतली, तरीही लोकांनी त्याला ओळखलं. दोन दिवस शिखर धवन काशीमध्ये होता. मंगळवारी रात्री त्याने बाबा काल भैरव आणि काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 4 टेस्ट मॅचच्या सीरिजला 5 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. या सीरिजच्या पहिल्या दोन टेस्टसाठी शिखर धवनची निवड झालेली नाही. पण वनडे आणि टी-20 सीरिजसाठी धवनची निवड होईल, हे निश्चित मानलं जात आहे.

Published by: Shreyas
First published: January 25, 2021, 10:49 AM IST
Tags:

ताज्या बातम्या