मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Shikhar Dhawan: तू जो मिला... मुलाला पाहताच 'गब्बर' का झाला इतका भावूक? हे आहे कारण...

Shikhar Dhawan: तू जो मिला... मुलाला पाहताच 'गब्बर' का झाला इतका भावूक? हे आहे कारण...

शिखर धवन मुलगा जोरावरसह

शिखर धवन मुलगा जोरावरसह

Shikhar Dhawan: 2012 मध्ये धवननं आएशा मुखर्जीशी लग्न केलं होतं. पण गेल्या वर्षी त्यांनी घटस्फोट घेतला. धवन आणि आएशाचा मुलगा जोरावर सध्या आएशासोबत ऑस्ट्रेलियात राहतो. त्यामुळे धवन आणि त्याची भेट अनेक महिन्यांनी होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 19 नोव्हेंबर: टीम इंडियाचा सध्याचा वन डे कॅप्टन शिखर धवन सोशल मीडियात चांगलाच अॅक्टिव्ह असतो. त्याचे रिल्स आणि इतर पोस्टची चांगलीच चर्चा होते. धवननं नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. धवन आणि त्याचा मुलगा जोरावर यांच्या भेटीचा हा व्हिडीओ आहे. पण या भेटीत इतकं काय? असं तुम्हाला वाटत असेल. पण मुलाला भेटल्यानंतर तो भावूक होण्याचं कारण वेगळंच आहे.

वर्षभरापूर्वी धवन आणि आएशाचा घटस्फोट

2012 मध्ये धवननं आएशा मुखर्जीशी लग्न केलं होतं. पण गेल्या वर्षी त्यांनी घटस्फोट घेतला. धवन आणि आएशाचा मुलगा जोरावर सध्या आएशासोबत ऑस्ट्रेलियात राहतो. त्यामुळे धवन आणि त्याची भेट अनेक महिन्यांनी होते. म्हणूनच धवन न्यूझीलंड दौऱ्यावर जाण्याअगोदर मुलाला भेटला तेव्हा तो भावूक झाला होता. इन्स्टाग्रामवर त्यानं केलेल्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

धवन-आएशाची लव्ह स्टोरी

2012 साली वयानं 11 वर्षांनी मोठ्या असलेल्या आएशाशी धवननं लग्न केलं होतं. महत्वाचं म्हणजे आएशाचं हे दुसरं लग्न होतं आणि त्याआधी तिला दोन मुलीही होत्या. आएशाचा जन्म भारतात झाला असला तरी ती वाढली ऑस्ट्रेलियामध्ये. मेलबर्नमध्ये सध्या तिचं घरही आहे. 2009 मध्येच या दोघांची ओळख झाली होती. पण आएशा घटस्फोटित आणि दोन मुलांची आई असल्यानं धवनच्या घरच्यांचा लग्नाला विरोध होता. मात्र तीन वर्षांनी धवन घरच्यांची समजूत घालण्यात यशस्वी झाला आणि 2012 मध्ये दोघांचं लग्न झालं. त्यानंतर 2014 मध्ये आएशानं जोरावरला जन्म दिला.

हेही वाचा - Asian Cup TT: खेळासाठी मॉडेलिंग सोडलं... 'या' मुलीने आज भारताला जिंकून दिलं ऐतिहासिक मेडल; Video

2021 मध्ये झाले वेगळे

सप्टेंबर 2021 मध्ये इन्स्टाग्रामवरुन आएशानंच त्या दोघांचा घटस्फोट झाल्याची माहिती दिली होती. पण का? याचं उत्तर दोघांकडूनही मिळालं नाही. धवननंही याविषयी जाहीरपणे भाष्य केलेलं नाही.

First published:

Tags: Cricket, Cricket news, Shikhar dhawan, Sports