Home /News /sport /

'बाप बाप होता है...', वडिलांनी शिखर धवनच्या कानाखालीच हाणली, पाहा VIDEO

'बाप बाप होता है...', वडिलांनी शिखर धवनच्या कानाखालीच हाणली, पाहा VIDEO

टीम इंडियाचा स्टार ओपनर शिखर धवन (Shikhar Dhawan) सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असतो. सहकारी खेळाडूंसोबतचे फोटो आणि डान्स करतानाचे व्हिडिओदेखील धवन सोशल मीडियावर शेयर करतो.

  नवी दिल्ली, 25 जानेवारी : टीम इंडियाचा स्टार ओपनर शिखर धवन (Shikhar Dhawan) सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असतो. सहकारी खेळाडूंसोबतचे फोटो आणि डान्स करतानाचे व्हिडिओदेखील धवन सोशल मीडियावर शेयर करतो. धवनचे हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. यावेळी धवनने त्याच्या वडिलांसोबतचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये धवनच्या वडिलांनी त्याच्या थोबाडात मारली. या व्हिडिओमध्ये धवन त्याच्या वडिलांसोबत मस्ती करताना दिसत आहे. यानंतर वडिलांनी धवनच्या श्रीमुखात भडकावली. बाप हमेशा बाप होता है, असं कॅप्शन धवनने या व्हिडिओला दिलं आहे. हरभजन सिंगनेही या व्हिडिओवर बेस्ट अशी कमेंट केली आहे.
  या व्हिडिओमध्ये धवनचे वडील त्याला तू आतमध्ये फिरून आलास का? असं पंजाबीमध्ये विचारतात. यावर धवन मस्तीमध्ये वॉरंट आणलाय का? सबूत आहे का तुमच्याकडे? असं विचारतो. यानंतर धवनचे वडील त्याच्या कानफटात मारतात आणि साफसफाई करायला सांगतात. मग धवनही गालावर हात ठेवून खोलीत निघून जातो. शिखर धवन दक्षिण आफ्रिका दौऱ्याहून घरी परतला आहे. टेस्ट आणि वनडे सीरिजमध्ये भारताचा पराभव झाला असला, तरी वनडे सीरिजमध्ये शिखर धवनची कामगिरी उल्लेखनीय झाली. धवनने तीन वनडे मॅचच्या सीरिजमध्ये दोन अर्धशतकांच्या मदतीने 79, 29 आणि 61 रनचा स्कोअर केला.
  Published by:Shreyas
  First published:

  Tags: Shikhar dhawan

  पुढील बातम्या