लंडन, 19 जून : भारताचा सलामीवीर शिखर धवन ICC Cricket World Cup 2019 मध्ये दुखापतीमुळे खेळता येणार नाही. अंगठ्याला झालेल्या दुखापतीने आयसीसीच्या या मोठ्या स्पर्धेतून तो बाहरे पडला आहे. त्यानंतर धवनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यानं म्हटलं आहे की, कठीण काळात साथ दिल्याबद्दल सर्व संघ सहकाऱ्यांचे आणि चाहत्यांचे आभार. मी तंदुरुस्त होऊ शकलो नाही पण खेळ पुढे सुरू राहिला पाहिजे.
सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेत खेळू शकणार नसल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. त्याच्या जागी रिषभ पंतचा संघात समावेश करण्यात आला आहे. धवनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यावेळी अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी रिषभ पंतला इंग्लंडला बोलावण्यात आलं होतं. धवन किमान शेवटच्या काही सामन्यात खेळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, त्याची दुखापत जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत बरी होण्याची शक्यता कमी असल्याने तो संपूर्ण स्पर्धेला मुकणार आहे.
I feel emotional to announce that I will no longer be a part of #CWC19. Unfortunately, the thumb won’t recover on time. But the show must go on.. I'm grateful for all the love & support from my team mates, cricket lovers & our entire nation. Jai Hind!🙏 🇮🇳 pic.twitter.com/zx8Ihm3051
— Shikhar Dhawan (@SDhawan25) June 19, 2019
धवनने शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटलं आहे की, मला वर्ल्ड कपमध्ये खेळता येणार नसल्यानं वाईट वाटत आहे. दुर्दैवानं अंगठ्याची दुखापत लवकर बरी होणार नाही. माझ्या संघ सहकाऱ्यांनी, चाहत्यांनी आणि देशातील लोकांनी साथ दिलीत त्याबद्दल आभार.
सध्या भारतीय संघाचा खेळ चांगला सुरू असून यापुढेही असाच खेळ राहिल आणि भारत वर्ल्ड कप जिंकेल अशी आशा आहे. आमच्यासाठी प्रार्थना करा कारण ते महत्त्वाचे आणि खास आहे असंही धवन म्हणाला.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्याने शतकी खेळी केली होती. धवनच्या 117 धावांच्या जोरावर भारताने 300 पेक्षा जास्त धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियासमोर दिलं होतं. त्यानंतर भारताने सामना जिंकला होता.
वाचा- सोनाली बेंद्रेसोबतच्या अफेअरवर शोएबचं स्पष्टीकरण, ती सुंदर पण...
वाचा-पांड्याचा खळबळजनक खुलासा, क्रिकेट आणि मुली नाही तर यात अडकला जीव
वाचा- 'तुमचा राग माझ्यावर काढू नका', वीणानंतर नेटकऱ्यांवर भडकली सानिया
VIDEO : ...तर लाज का वाटते, उद्धव ठाकरेंचा ओवेसींवर हल्लाबोल