नवी दिल्ली, 19 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये अंगठ्याच्या दुखापतीमुळं शिखर धवनला मुकावे लागले होते. त्यानंतर तब्बल महिन्याभरानंतर धवन पहिल्यांदाच मैदानात मैदानात उतरला आणि त्यानं बॅट हातात घेतली. मात्र धवन क्रिकेटसाठी नाही तर एका चॅलेंजसाठी मैदानात उतरला होता. हे चॅलेंज आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेले बॉटल कॅप चॅलेंज (Bottle Cap Challenge). धवनला हे चॅलेंज भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगनं दिले होते.
धवननं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तो हातात बॅट घेऊन नेटमध्ये प्रॅक्टिस करताना दिसत आहे. मात्र तो चेंडूनं शॉट नाही तर, बॉटलचे कॅप उडवताना दिसत आहे. धवननं आपल्या ट्वीटमध्ये, "युवी पाजी हा आहे माझा बॉटल कॅप चॅलेंज (Bottle Cap Challenge)चॅलेंज. आज मी पहिल्यांदाच दुखापतीनंतर फलंदाजी करत आहे. मला आनंद वाटत आहे", असे म्हटले आहे.
Yuvi Paaji, here is my #BottleCapChallenge! This is the first time I am picking my bat up after my injury..feels good to be back! 💪 @YUVSTRONG12 pic.twitter.com/NaFADCbV8K
— Shikhar Dhawan (@SDhawan25) July 18, 2019
सर्वात आधी युवराजनं हे चॅलेंज केले होते. त्यानं हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी शिखर धवन, सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा आणि ख्रिस गेल यांना आव्हान केले होते. यावेळी युवी बॅटनं शॉट मारत बॉटलची कॅप उडवत आहे.
वाचा- धोनीला सचिन, सेहवाग आणि मी एकाचवेळी संघात नको होतो; गंभीरचा खळबळजनक खुलासा
Laureus Ambassador @YUVSTRONG12 with his own twist on the #BottleCapChallenge... 🏏
— Laureus (@LaureusSport) July 8, 2019
What you got @MichaelVaughan? 😉pic.twitter.com/ac7dKYf79C
वाचा- IND vs WI : वेस्ट इंडिज दौरा नाही सोपा, भारताचा 'हा' अष्टपैलू खेळाडू संघाबाहेर
असा असेल वेस्ट इंडिज दौरा
ऑस्ट्रेलियाविरोधात फलंदाजी करताना शिखर धवनच्या उजव्या अंगठ्याला दुखापत झाली होती. या दुखापतीतच त्यानं 117 धावांची शतकी खेळी केली होती. त्यानंतर मात्र वर्ल्ड कपमधून शिखर धवन बाहेर पडला होता. दरम्यान 3 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी धवन फिट नसल्यामुळं त्याची निवड करण्यात येणार नाही आहे.
वाचा- क्रिकेटच्या नियमांमध्ये ICCने केले दोन मोठे बदल; निकालावर होणार परिणाम!
वडिलांसमोर मुलाने धावत्या लोकल समोर मारली उडी, ठाणे स्टेशनवरचा LIVE VIDEO