मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

धवन-आयशाचा घटस्फोट, पहिल्यांदाच आई-वडिलांबद्दल बोलली मुलगी

धवन-आयशाचा घटस्फोट, पहिल्यांदाच आई-वडिलांबद्दल बोलली मुलगी

काही महिन्यांपूर्वी भारताचा ओपनर शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि त्याची पत्नी आयशा मुखर्जी (Ayesha Mukherjee) घटस्फोटामुळे चर्चेत होते.

काही महिन्यांपूर्वी भारताचा ओपनर शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि त्याची पत्नी आयशा मुखर्जी (Ayesha Mukherjee) घटस्फोटामुळे चर्चेत होते.

काही महिन्यांपूर्वी भारताचा ओपनर शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि त्याची पत्नी आयशा मुखर्जी (Ayesha Mukherjee) घटस्फोटामुळे चर्चेत होते.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 20 डिसेंबर : काही महिन्यांपूर्वी भारताचा ओपनर शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि त्याची पत्नी आयशा मुखर्जी (Ayesha Mukherjee) घटस्फोटामुळे चर्चेत होते. आयशाने इन्स्टाग्रामवर मोठी पोस्ट लिहून घटस्फोटाबाबत तिचं मत मांडलं होतं. दोन वेळा घटस्फोट घेतल्यानंतर काय वाटतं, याबाबत तिने या पोस्टमध्ये लिहिलं होतं. आयशाने तिचं जुनं इन्स्टाग्राम अकाऊंटही डिलीट केलं. आयशाला पहिल्या लग्नापासून दोन मुली आहेत. धवनने या दोन्ही मुलींना त्याचं नाव दिलं, तर शिखर धवन आणि आयशाला एक मुलगा आहे.

मोठी मुलगी आलिया धवनने घटस्फोटाच्या चर्चांमध्येच पहिली इन्स्टाग्राम पोस्ट लिहिली, यात ती आई-वडिलांबद्दल बोलली. आलिया धवनचं इन्स्टाग्राम अकाऊंट व्हेरिफाईड नाही, पण शिखर धवनने आलियासोबत आपले जुने फोटो पोस्ट करताना याच अकाऊंटला टॅग केलं होतं.

आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पहिली पोस्ट केली आणि आपल्या आयुष्यातील सगळ्यात आनंदी क्षण सांगितले. यानंतर यूजर्सनीही त्यांच्या आयुष्यातले आनंदी क्षण सांगितले. एका यूजरने माझे आई-वडील खूश असले तर माझा आनंद द्विगुणीत व्हायचा असं सांगितलं. यावर आलियाने खरंच आई-वडील कोणाच्याही आयुष्यातले आशिर्वाद असतात, त्यांच्याबरोबर असण्यानेच आशिर्वाद मिळतो, फक्त त्यांना मिठी मारा, असं उत्तर आलियाने दिलं.

आयशने केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे शिखर धवनचा घटस्फोट झाल्याचं समोर आलं. 'एकवेळा घटस्फोट झाला, दुसऱ्यांदा खूप काही सिद्ध करायच होतं. त्यामुळे जेव्हा दुसरं लग्न तुटलं तेव्हा हे खूप भयावह होतं. घटस्फोट घाणेरडा शब्द आहे, असा विचार मी केला होता, पण माझा दोनवेळा घटस्फोट झाला. पहिल्यांदा घटस्फोट झाला तेव्हा मी घाबरले होते, मला वाटलं मी अपयशी झाले,' असं आयशा तिच्या पोस्टमध्ये म्हणाली होती. शिखर धवनने याबाबत अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

First published:

Tags: Shikhar dhawan