IND vs ENG: T20 सीरीजसाठी या दोन खेळाडूंनी कारने केला 11 तास प्रवास

India vs England: इंग्लंड विरुद्धच्या 5 T -20 मालिकेसाठी भारतीय संघात असलेले श्रेयस अय्यर आणि शिखर धवन यांनी 11 तास कारने प्रवास करून जयपूर ते अहमदाबाद अंतर गाठले. अय्यरने हे चित्र सोशल मीडियावर शेअर केले आहे.

India vs England: इंग्लंड विरुद्धच्या 5 T -20 मालिकेसाठी भारतीय संघात असलेले श्रेयस अय्यर आणि शिखर धवन यांनी 11 तास कारने प्रवास करून जयपूर ते अहमदाबाद अंतर गाठले. अय्यरने हे चित्र सोशल मीडियावर शेअर केले आहे.

  • Share this:
    अहमदाबाद, 3 मार्च : भारत (India) आणि इंग्लड (England) दरम्यान 4 टेस्ट सीरीजनंतर 12 मार्चपासून 5 टी 20 सामन्यांची मालिका (T20 Serise) खेळली जाणार आहे. या मालिकेतील सर्व सामने अहमदाबादमधील (Ahmadabad) नरेंद्र मोदी स्टेडीअमवर खेळले जातील. या सामन्यांसाठी निवड झालेले खेळाडू आता अहमदाबादमध्ये पोहचू लागले आहेत. शिखर धवन (Shikar Dhawan) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) टी 20 सिरीजसाठी मंगळवारी अहमदाबादला पोहचले. हे दोन्ही खेळाडू विजय हजारे ट्रॉफीतील एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेत खेळत होते. मात्र टी 20 मालिकेसाठी हे दोघेही हे सामने सोडून मंगळवारी कारमधून 11 तासांचा प्रवास करुन जयपूर (Jaipur) येथून अहमदाबादला पोहोचले. श्रेयस अय्यर याने शिखर धवनसह प्रवासातील फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर (Instagram Account) शेअर केले आहेत. यात श्रेयस लिहितो, अहमदाबादपर्यंतचा 11 तासांचा प्रवास. बघुया इतका वेळ चेहऱ्यावरील हसू कायम राहतं का. धवनने देखील अहमदाबाद येथे पोहोचताच श्रेयससोबतचा फोटो शेअर केलाय. भारतीय संघासोबत पुन्हा एकदा जोडले जाताना खूपच छान वाटतयं, असंही त्याने म्हटलंय. अय्यरने विजय हजारे ट्रॉफीतील सामन्यांमध्ये लागोपाठ केली दोन शतकं अय्यर आणि धवन सध्या चांगलेच फॉर्ममध्ये आहेत. या दोन्ही बॅटसमनने विजय हजारे ट्रॉफीतील (VIjay Hazare Trophy) सामन्यांमध्ये चांगल्या धावा काढल्या आहेत. धवनने मालिकेतील 5 मॅचेसमध्ये 203 रन्स केलेत. त्याने महाराष्ट्राविरुध्दच्या सामन्यात 118 चेंडूत 153 रन्स केले होते. त्यामुळे दिल्लीने महाराष्ट्राविरोधात 330 धावांचे लक्ष्य पार केलं होतं. अय्यरने देखील मुंबई संघाकडून खेळताना 4 सामन्यांमध्ये 260 रन्स केले. त्याने मालिकेत महाराष्ट्र आणि राजस्थान विरुद्धच्या सामन्यांमध्ये दोन शतकं ठोकली होती.

    (वाचा -  IND vs ENG : चौथी टेस्ट हरल्यानंतरही भारत WTC फायनलमध्ये जाणार, कसं ते वाचा)

    अशी असेल इंग्लड टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, के.एल. राहूल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंडया, ऋषभ पंत, इशान किशन, यजुवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर.
    First published: