विराटला डबल धक्का, टीम इंडियासाठी एका दिवसात दोन वाईट बातम्या

विराटला डबल धक्का, टीम इंडियासाठी एका दिवसात दोन वाईट बातम्या

न्यूझीलंड दौऱ्याआधी भारतीय संघाला दुखापतीचे ग्रहण लागले आहे. शिखर धवननंतर आणखी एक खेळाडू दुखापतीमुळे न्यूझीलंड दौऱ्याला मुकणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 जानेवारी : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला न्यूझीलंड दौऱ्याआधी डबल धक्का बसला आहे. न्यूझीलंड दौऱ्याला जाण्यापूर्वी भारतीय संघाच्या अडचणी वाढत चालल्या आहेत.  भारताचा सलामीवीर शिखर धवन टी20 आणि एकदिवसीय संघातून बाहेर झाला आहे. आता त्याच्यानंतर वेगवान गोलंदाज इशांत शर्माला सुद्धा दुखापत झाली आहे. त्यामुळे तो कसोटी मालिकेला मुकणार आहे.

इशांत शर्माला रणजी ट्रॉफीत खेळताना दुखापत झाली. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून तो न्यूझीलंड दौऱ्यापर्यंत तंदुरुस्त होण्याची शक्यता कमी आहे. भारत 21 ते 25 फेब्रुवारी आणि 29 फेब्रुवारी ते 4 मार्च असे दोन कसोटी सामने खेळणार आहे. इशांत शर्माला झालेली दुखापत गंभीर असून त्याला सहा महिन्यांसाठी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

रणजी ट्रॉफीमध्ये इशांद शर्माचा पाय मुरगळला होता. त्यानंतर तो सामन्यातून बाहेर पडला होता. दिल्ली जिल्हा क्रिकेट संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की, इशांत शर्माच्या एमआरआयचा रिपोर्ट आला असून त्यात कोणतंही फ्रॅक्चर नसल्याचं दिसत आहे. मात्र दुखापतीमुळे त्याला चालण्याचा त्रास होत आहे. इशांत शर्मा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत काही दिवस राहिल असंही पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

वाचा : गोलंदाजाचा कहर! 175 किमी वेगाने चेंडू टाकत मोडला अख्तरचा वर्ल्ड रेकॉर्ड?

बीसीसीआय़च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इशांत शर्माच्या रिपोर्टनुसार पुढची प्रक्रिया पार पडणार आहे. इशांत शर्माच्या जागी नवदीस सैनीची वर्णी संघात लागू शकते. न्यूझीलंडविरुद्ध पहिली कसोटी 21 फेब्रुवारीपासून खेळण्यात येणार आहे.

वाचा : प्रतिस्पर्धी संघाचे 5 फलंदाज शून्यावर बाद, भारताने 29 चेंडूतच जिंकला सामना!

First published: January 21, 2020, 6:36 PM IST

ताज्या बातम्या