केएल राहुल आणि अनुष्काबद्दल युजरनं केली कमेंट, भारताच्या युवा क्रिकेटपटूनं घेतलं फैलावर

केएल राहुल आणि अनुष्काबद्दल युजरनं केली कमेंट, भारताच्या युवा क्रिकेटपटूनं घेतलं फैलावर

अनुष्का आणि केएल राहुलबद्दल कमेंट केल्यानंतर तुला शिष्टाचार शिकण्याची गरज असून क्रिकेटपासून कुटुंब दूर ठेवायला हवं असं शेल्डन जॅक्सनने म्हटलं आहे.

  • Share this:

मुंबई, 13 सप्टेंबर : सौराष्ट्रकडून रणजी क्रिकेट खेळणाऱा फलंदाज शेल्डन जॅक्सनने गेल्या आठवड्यात बीसीसीआयनं सौराष्ट्रसारख्या संघाकडं दुर्लक्ष केल्याचा आरोप केला होता. त्यानं म्हटलं होतं की, रणजी ट्रॉफीची फायनल खेळल्यानंतरही सौराष्ट्रच्या खेळाडूंची निवड इंडिया ए मध्ये झाली नाही. त्यानं सोबत रणजीत सर्वाधिक धावा करणाऱ्या आणि विकेट घेणाऱ्या खेळाडूंची नावेही टाकली होती. शेल्डन जॅक्सनने म्हटलं होतं की, निवडीत पारदर्शकता असायला हवी. आमची निवड कशामुळे होऊ शकली नाही. आमच्यात असलेल्या उणीवांची जाणीव आम्हाला व्हायला पाहिजे असंही त्यानं म्हटलं होतं.

दरम्यान, यावर एका जुयरनं शेल्डन जॅक्सनला रिप्लाय देताना चुकीच्या अर्थानं कमेंट केली. शेल्डनने त्या युजरला फैलावर घेतलं. केएल राहुलची कामगिरी चांगली नसतानाही त्याला संघात स्थान मिळाले आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्कासोबत मैत्री असल्यानं हे झालं असल्याचं युजरनं म्हटलं आहे. जॅक्सनने त्या युजरला म्हटलं की, तुला शिष्टाचार शिकण्याची गरज आहे. क्रिकेटच्या मुद्द्यांना कुटुंबापासून दूर ठेवायला पाहिजे.

जॅक्सनने गेल्या रणजी हंगामात 854 धावा केल्या होत्या. सौराष्ट्रनं अंतिम सामन्यात धडक मारली होती. यानंतर जॅक्सनला दलीप ट्रॉफी आणि इंडिया ए संघात संधी दिली नाही. याआधीही त्याला संघात घेण्यात आलं नव्हतं. त्यानंतर जॅक्सनने नाराजी व्यक्त केली होती.

डोमेस्टिक क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूला आशा असते की चांगली कामगिरी केल्यास एक दिवस भारतीय संघासाठी खेळायला मिळेल. भारतीय संघात येण्यापूर्वी त्यांना इंडिया ए मध्ये खेळवलं जातं. मात्र, सौराष्ट्रच्या खेळाडूंना डावललं गेल्यानं आता एका खेळाडूनं आरोप शेल्डनने केले होते.

शेल्डनने ट्विटरवर म्हटलं की, सौराष्ट्रनं यावर्षी रणजी ट्रॉफीत अंतिम सामना खेळला. यात हैराण करणारी गोष्ट ही आहे की सर्व स्तरात चांगली कामगिरी करूनही खेळाडूंना इंडिया ए मध्ये स्थान मिळालं नाही. तर रणजी ट्रॉफी खेळण्याची किंमत शून्य आहे का?

मी प्रश्न उपस्थित करत नाही पण मला वाटतं की चांगली कामगिरी करत असतानाही निवड होत नसेल तर आमच्यात काय कमी आहे हे जाणून घ्यायचं आहे. आमचं क्रिकेट करिअर कोणत्या दिशेनं जात आहे कळत नाही. निवड समितीनं पारदर्शक काम केलं पाहिजे असा सल्लाही शेल्डननं निवड समितीला दिला आहे.

ज्युनिअर युवराज म्हणून ओळखला जायचा हा युवा खेळाडू; Team India मध्ये मिळालं स्थान

धोनीच्या निवृत्तीवर बातमीवर निवड समितीच्या प्रमुखांचा मोठा खुलासा

लालाबागच्या राजाच्या विसर्जनाचा LIVE VIDEO; गिरगाव चौपाटीवर भाविकांची अलोट गर्दी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 13, 2019 11:22 AM IST

ताज्या बातम्या