सिडनी, 12 नोव्हेंबर : भारत-ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात 27 नोव्हेंबरपासून तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 , चार कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. दरम्यान, याआधीच ऑस्ट्रेलियाचे दोन खेळाडूं एकमेकांविरुद्ध भिडल्याचे पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल स्टार्कचं (Mitchell Starc) प्रथम श्रेणी क्रिकेटमधलं शतक केवळ 14 धावांनी चुकलं. तस्मानिया आणि न्यू साउथ वेल्स यांच्यात शेफील्ड शील्ड स्पर्धेत सामना झाला. या सामन्यात न्यू साउथ वेल्सकडून खेळताना स्टार्कनं 132 चेंडूत 86 धावांची खेळी केली. स्टार्कला आपलं शतक पूर्ण करण्यासाठी केवळ 14 धावांची गरज असताना कर्णधारानं डाव घोषित केला.
न्यू साउथ वेल्सचा कर्णधार पीटर नेव्हिलनं डाव घोषित केल्यानंतर स्टार्क जेव्हा पेव्हलियनमध्ये पोहचला तेव्हा त्यानं बॅट फेकून दिली. त्याच्या चेहऱ्यावरही राग दिसत होता. सोशल मीडियावर क्रिकेट ऑस्ट्रेलियानं हा व्हिडीओ शेअर केला आहे. न्यू साउथ वेल्स संघानं 6 विकेट गमावत 522 धावा केल्या होत्या. त्यावेळी कर्णधारानं डाव घोषित केला. स्टार्कनं यात नाबाद 86 धावा केल्या.
वाचा-भारताला हरवण्यासाठी ऑस्ट्रेलियाची चाल, कसोटी संघात 'या' युवा खेळाडूंना संधी
Peter Nevill declared while Mitch Starc was on 86*...
The quick wasn't too happy! #SheffieldShield pic.twitter.com/NQLTkh1L0w
— cricket.com.au (@cricketcomau) November 10, 2020
वाचा-5 IPL जिंकणाऱ्या रोहितलाच दिग्गज क्रिकेटपटूनं आपल्या IPL संघातून वगळलं!
स्टार्कची प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 99 ही सर्वोत्तम खेळी आहे. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यानं भारताविरुद्ध 2013मध्ये 99 धावांची खेळी केली होती. स्टार्कच्या नावावर एकही शतक नाही आहे. त्यामुळे या सामन्यात त्याला पहिलं शतक करण्याची संधी होती. मात्र कर्णधारानं डाव घोषित केल्यामुळे स्टार्कचं हे स्वप्न भंगलं.
वाचा-पैशांचा पाऊस! वाचा ऑरेंज-पर्पल कॅप जिंकणाऱ्या खेळाडूंचा बंँक बॅलन्स कितीने वाढला
भारत-विरुद्ध ऑस्ट्रेलिया दौरा
पहिली ODI : 27 नोव्हेंबर सिडनी
दुसरी ODI : 29 नोव्हेंबर - सिडनी
तिसरी ODI : 02 डिसेंबर - कॅनबरा
पहिली टी20 : 04 डिसेंबर - कॅनबरा
दुसरी टी20 : 06 डिसेंबर - सिडनी
तिसरी टी20 : 08 डिसेंबर - सिडनी
पहिला टेस्ट मॅच : 17 डिसेंबर ते 21 डिसेंबर - एडिलेड
दुसरी टेस्ट मॅच : 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर - मेलबर्न
तिसरा टेस्ट मॅच : 07 जानेवारी ते 11 जानेवारी - सिडनी
चौथी टेस्ट मॅच : 15 जानेवारी ते 19 जानेवारी - ब्रिसबेन