तिला क्रिकेट खेळण्यासाठी व्हावं लागलं 'मुलगा', वडिलांचा संघर्ष वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

तिला क्रिकेट खेळण्यासाठी व्हावं लागलं 'मुलगा', वडिलांचा संघर्ष वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

शेजारी आणि नातेवाईकांनी टोमणे मारत प्रश्न विचारले तेव्हा शेफाली म्हणाली होती की, एक दिवस हेच लोक कौतुक करतील.

  • Share this:

सूरत, 03 ऑक्टोबर : भारताच्या महिला क्रिकेट संघांने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 51 धावांनी विजय मिळवला. या विजयात 15 वर्षीय शेफाली वर्माने महत्त्वाची भूमिका बजावली होती. यानंतर टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तिने धक्कादायक खुलासा केला आहे. मुलगी असल्यानं हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील सर्व क्रिकेट अकॅडमीमध्ये तिला प्रवेश नाकारण्यात आला होता. पण क्रिकेट खेळायचंच हे स्वप्न उराशी बाळगलेल्या शेफालीने मुलग्यासारखी वेशभुषा करून प्रशिक्षण घेतलं असं तिच्या वडिलांनी सांगितलं.

शेफालीच्या वडिलांनी सांगितलं की, मुलींसाठी रोहतकमध्ये एकही अकॅडमी नव्हती. त्यावेळी तिला प्रवेश मिळावा म्हणून भिक मागितली तरीही कोणी ऐकलं नाही. शेवटी मुलीचे केस कापून तिला एका अकॅडमीत घेऊन गेलो आणि मुलाप्रमाणे प्रवेश घेतला.

मुलांच्या संघातून खेळताना अनेकदा दुखापत झाली. तरीही न डगमगता तिने क्रिकेट खेळणं सुरू ठेवलं. तिच्या वडिलांनी सांगितलं की, मुलांविरुद्ध खेळणं सोप्पं नव्हतं. अनेकदा चेंडू हेल्मेटवर लागायचा. पण शेफालीने धैर्यानं सामना केला.

एखादी मुलगी मुलगा होऊन खेळते तेव्हा तिला कोणीच कसं ओळखलं नाही असं विचारल्यानंतर शेफालीच्या वडिलांनी सांगितलं की, मला भिती होती पण कोणीही तिला ओळखलं नाही. वयच असं होतं की मुलगा मुलगी कळत नव्हतं.

शेफालीने मंगळवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 33 चेंडूत 46 धावा केल्या. पदार्पणाच्या सामन्यात चार चेंडू खेळून ती शून्यावर बाद झाली होती. त्याबद्दल सांगताना ती म्हणाली की, पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर मला वाईट वाटलं होतं. त्यावेळी वरिष्ठ खेळाडूंनी आधार दिला. आता संघाच्या विजयात योगदान दिल्याचा आनंद आहे असंही शेफाली म्हणाली.

भारतीय संघात निवड होईपर्यंत शेफालीचा प्रवास सहज नव्हता. या काळात अनेक गोष्टींना तिला तोंड द्यावं लागलं. क्रिकेट अकॅडमीत प्रवेश तर मिळवला पण शेजारी आणि नातेवाईकांनी बोलायला सुरूवात केली. तुमची मुलगी मुलांसोबत खेळते. मुलींचे क्रिकेटमध्ये कोणतेही भविष्य नाही. त्यावेळीच शेफाली म्हणाली होती की, एक दिवस हेच लोग माझं कौतुक करतील असंही शेफालीच्या वडिलांनी सांगितलं.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला आदर्श मानून 5 वर्षांपूर्वी शेफालीनं क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. सचिन त्याचा शेवटचा रणजी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. तेव्हा त्याला खेळताना पाहून क्रिकेटमध्येच करिअर करायचं असं तिनं ठरवलं होतं.

शेफाली सर्वात पहिल्यांदा 2018-19 मध्ये आंतरराज्य महिला टी20 स्पर्धेवेळी चर्चेत आली होती. यामध्ये तिनं नागालँडविरुद्ध 56 चेंडूत 128 धावांची खेळी केली होती. त्यानंतर आयपीएलदरम्यान महिला टी20 चॅलेंजमध्ये तिनं आंतरराष्ट्रीय खेळाडूंविरुद्ध 31 चेंडूत 34 धावांची खेळी केली होती.

VIDEO : चंद्रकांत पाटलांचा मार्ग मोकळा; कोथरूडमधील दुसरे बंड ही शांत!

Published by: Suraj Yadav
First published: October 3, 2019, 11:17 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading