‘क्रिकेट आता खेळ नाही धंदा झाला आहे’, माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा

‘क्रिकेट आता खेळ नाही धंदा झाला आहे’, माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा

आपला देश नाही तर खेळाडूंना आता पैसा प्यारा, महान खेळाडूचा खुलासा.

  • Share this:

विशाखापट्टणम, 04 ऑक्टोबर : क्रिकेट हा खेळ फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात बहुचर्चित आहे. कोणत्याही देशाकडून क्रिकेट खेळण्यासाठी अपार मेहनत करावी लागते. 90च्या दशकात खेळाडू आपलं घर-दार विकून क्रिकेट खेळायचे. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. दरम्यान एका महान खेळाडूनं तर क्रिकेट हा खेळ नसून धंदा झाला आहे, असा धक्कादायक खुलासा केला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा महान खेळाडू शॉन पोलॉकनं क्रिकेट हा खेळ नसून धंदा झाल्याचे मत व्यक्त केले आहे. शॉननं, आपल्या देशातील खेळाडू राष्ट्रीय संघात खेळण्यापेक्षा काउंटी क्रिकेट खेळणे पसंत करतात, असा खुलासा केला आहे. शॉननं एका कार्यक्रमात, “खेळाडू आपल्या देशात क्रिकेट खेळत नाही ही एक समस्या आहे. मात्र या समस्येवर काही उपाय नाही आहे, कारण खेळ आता व्यवसाय झाला आहे”, असे सांगितले. या वर्षी 27 वर्षांचा गोलंजाज डुएल ओलिव्हरनं दक्षिण आफ्रिकेकडून 10 कसोटी सामने खेळल्यानंतर कोल्पॅक करार केला. तर, दिग्गज गोलंदाज मॉर्ने मॉर्कलनं गेल्या वर्षी काउंटी क्रिकेट खेळता यावे यासाठी 33व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

वाचा-रोहित शर्माच्या एका शतकामुळं 4 फलंदाजांचे करिअर धोक्यात!

काया आहे कोल्पॅक करार

कोल्पॅक करारात खेळाडू युरोपीय देशांमध्ये क्रिकेट खेळू शकतात. त्यांना विदेशी खेळाडू मानले जात नाही. त्यामुळं असे खेळाडू काउंटी क्रिकेटमध्ये करार करू शकतात. शॉननं शुक्रवारी पीटीआयला दिलेल्या माहितीत, “संघ निवडताना तुम्हाला अपेक्षा असते की चांगले खेळाडू संघात हवे. मात्र सध्याच्या आधुनिक जगात पैशांकडे पाहिले जाते. त्यामुळं खेळाडू देशासाठी खेळण्यासाठी उपलब्ध नसतात. क्रिकेट हा आता व्यवसाय झाला आहे”, असे सांगितले.

वाचा-जडेजाच्या मिस्ट्री बॉलवर गोंधळला फलंदाज! क्रिकेट सोडून खेळायला लागला हॉकी

2004नंतर अनेक खेळाडूंनी काउंटी क्रिकेटसाठी केला करार

2004नंतर अनेक खेळाडू कोल्पॅक कराराशी जोडले गेले आहेत. नुकतेच 27 वर्षांचा गोलंजाज डुएल ओलिव्हरनं दक्षिण आफ्रिकेकडून 10 कसोटी सामने खेळल्यानंतर कोल्पॅक करार केला. तर, दिग्गज गोलंदाज मॉर्ने मॉर्कलनं गेल्या वर्षी काउंटी क्रिकेट खेळता यावे यासाठी 33व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यावर महान गोलंदाज शॉन पोलॉकनं नाराजी व्यक्त केली आहेत. दक्षिण आफ्रिका संघासाठी पोलॉकनं 108 कसोटी सामने तर 303 एकदिवसीय सामने खेळले आहेत.

वाचा-VIDEO : भरमैदानात चाहत्यानं महिला अँकरला म्हटलं टीशर्ट काढ, तिने 'असं' दिलं उत्त

VIDEO: ठाण्यात गॅस पाईपलाईन फुटल्यानं उंच फवारे, परिसरातील गॅस पुरवठा बंद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 4, 2019 06:08 PM IST

ताज्या बातम्या