'पाकविरुद्ध वर्ल्डकपमध्ये न खेळणे म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करणे'

कारगिल युद्धावेळी भारताने वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळून त्यांना पराभूत केलं होतं.

  • Share this:

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरु्दध खेळू नये अशी मागणी होत आहे. बीसीसीआयने याबाबत सरकारने आम्हाला सांगावे असं म्हटलं आहे. यावर काँग्रेस नेते शशी थरुर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेस नेते शशी थरुर यांनी म्हटलं आहे की, पाकिस्तानविरुद्ध न खेळणं हे आत्मसमर्पणापेक्षा वाईट असेल. कारगिल युद्धाच्या काळात भारताने वर्ल्डकपमध्ये पाकिस्तनाला पराभूत केले होते.

यावेळी मॅच न खेळल्याने फक्त गुण कमी होणार नाहीत तर समर्पण करण्यापेक्षाही वाईट अवस्था असेल असं शशी थरुर यांनी म्हटलं. तसेच कोणताही संघर्ष न करता हार पत्करणे असाच यातून अर्थ निघत असल्याचे ते म्हणाले.पुढे वाचा...पाकिस्तानसोबत खेळावं की नको? कोण काय म्हणतंय पाहा

काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये भारतानं पाकिस्तानविरुद्ध खेळावं की नाही ?यावरून भारतीय क्रिकेट विश्वातील दिग्गज माजी खेळाडूंची भिन्न मतमतांतरं आहेत.

सामना रद्द करून पाकिस्तानला दोन गुण देणं मला अजिबात आवडणार नाही. तसं केल्यानं त्यांनाच फायदा होईल. पण माझं प्राधान्य माझ्या देशाला आहे. माझा देश जो निर्णय घेईल, मी त्याला मनापासून पाठिंबा देईन. - सचिन तेंडुलकर

आपण त्यांच्यासोबत कोणताच सामना खेळण्याची गरज नाही. वर्ल्ड कप देशापेक्षा मोठा नाही. - मोहम्मद अझरुद्दीन

भारतानं केवळ क्रिकेट, हॉकी किंवा फुटबॉल खेळणं थांबवून गप्प बसू नये, पाकसोबतचे सर्व संबंधच तोडून टाकावेत...

भारतानं केवळ क्रिकेट, हॉकी किंवा फुटबॉल खेळणं थांबवून गप्प बसू नये, पाकसोबतचे सर्व संबंधच तोडून टाकावेत.

पाकिस्तानसोबत वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची गरज नाही. देशहित सर्वात महत्त्वाचं आहे. - हरभजन सिंग

आपण आपल्या सुरक्षा दलांच्या पाठीशी ठाम उभं राहणं गरजेचं आहे. क्रिकेट हा माझ्या दृष्टीनं शेवटची गोष्ट आहे. - व्हीव्हीएस लक्ष्मण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 23, 2019 09:58 AM IST

ताज्या बातम्या