नवी दिल्ली, 18 सप्टेंबर : भारतात हॉकी, क्रिकेट आणि फुटबॉल वगळता आणखी एक खेळ असा आहे, जो खेळ स्वातंत्र्यपूर्व काळापासून खेळला जात आहे. हा खेळ म्हणजे गोल्फ. खर तर गोल्फ हा खेळ श्रीमंतांचा खेळ मानला जातो. भारतात राजा महाराजांच्या काळापासून गोल्फ हा खेळला जातो. सध्या अनेक युवा खेळाडू यात सामिल झाले आहे. यातील एक प्रसिध्द नाव म्हणजे शर्मिला निकोलेट.
शर्मिलाचा जन्म 1991मध्ये भारतात झाला. दरम्यान वयाच्या 11व्या वर्षापासून शर्मिलानं गोल्फ खेळण्यास सुरुवात केली. तर, वयाच्या 18व्या वर्षी शर्मिला प्रोफेशनल गोल्फर बनली.
आपल्या नावावर 11 प्रोफेशन टायटल आणि युरोपियन टूरमध्ये क्वालिफाय होणारी शर्मिला सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. तिच्या हॉट लुक आणि स्टाईलमुळं सोशल मीडिया चर्चेत असते.
शर्मिलाचा जन्म भारतात झाला असला तरी तिचे वडिल हे फ्रांसचे नागरिक आहे. तिची आई सुरेखा भारतीय असल्यामुळं शर्मिला भारतात राहिली.
फक्त गोल्फच नाही तर शर्मिलानं स्विमिंगमध्येही अनेक किताब जिंकले आहेत. शर्मिला नॅशनल सब ज्युनिअर स्विमिंग चॅम्पियनशीप मिळाली होती. फिटनेसच्याबाबत शर्मिला नेहमीच अव्वल असते.
शर्मिलाच्या लुकमुळं तीची जगातील सर्वात सुंदर गोल्फ खेळाडूंमध्ये गणना झाली आहे. शर्मिला सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून ती, नेहमीच चर्चेत असते.
VIDEO मुख्यमंत्र्यांना कोण खोटं बोलायला लावतंय?आदित्य ठाकरेंनी केला हा गंभीर आरोप
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा