Home /News /sport /

VIDEO शार्दुल ठाकुर दिसला Romantic अंदाजात; मितालीला म्हणाला, 'तू जिथे....

VIDEO शार्दुल ठाकुर दिसला Romantic अंदाजात; मितालीला म्हणाला, 'तू जिथे....

Shardul Thakur's romantic style

Shardul Thakur's romantic style

इंग्लंड विरुद्धची टेस्ट सीरिज आणि आयपीएल स्पर्धा गाजवणारा टीम इंडियाचा फास्ट बॉलर शार्दुल ठाकूरचा (Shardul Thakur) साखरपुडा झाला आहे.

  नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर: इंग्लंड विरुद्धची टेस्ट सीरिज आणि आयपीएल स्पर्धा गाजवणारा टीम इंडियाचा फास्ट बॉलर शार्दुल ठाकूरचा (Shardul Thakur) साखरपुडा झाला आहे. शार्दुलनं रविवारी त्याची गर्लफ्रेंड मिताला परुळकर (Mittali Parulkar) बरोबर साखरपुडा केला आहे. याच दरम्यानचा त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्याने मितालीसाठी खास शब्द बोले आहेत. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये हा सोहळा पार पडला. यामध्ये शार्दुल आणि मितालीच्या जवळच्या लोकांनीच हजेरी लावली. मात्र, शार्दुलने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एंगेजमेंटचा कोणताही फोटो किंवा व्हिडिओ शेअर केलेला नसला तरी त्याचे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. शार्दुलच्या साखरपुड्याला भारतीय वेगवान गोलंदाज दीपक चहरची बहीण मालती चहर हिनेदेखील हजेरी लावली होती. तिने आपल्या इस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केल आहे. ज्यामध्ये शार्दुल रोमँटिक मुडमध्ये दिसत आहे. या व्हिडीओमध्ये शार्दुल मितीलीला 'तु जिथे जाशील तिथे मला मिळवशील.' असे खास शब्द उच्चारतो. त्याचा हा रोमँटिक अंदाज लोकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by (@shardulxuniverse)

  शार्दुलचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मितीली आणि तो पंजाबी गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, शार्दुल आणि मिताली पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकानंतर विवाहबंधनात अडकणार आहेत. शार्दुल हा न्यूझीलंडविरुद्धच्या होम सीरिजमध्ये खेळत नाहीये. त्याला बीसीसीआयने वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत विश्रांती दिली आहे. डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत तो खेळण्याची शक्यता आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: Shardul Thakur

  पुढील बातम्या