Home /News /sport /

T20 World Cupसाठी टीम इंडियाच्या संघात शार्दूल ठाकूरची एन्ट्री; 'या' खेळाडूचा केला पत्ता कट

T20 World Cupसाठी टीम इंडियाच्या संघात शार्दूल ठाकूरची एन्ट्री; 'या' खेळाडूचा केला पत्ता कट

T20 World Cup संघात शार्दूल ठाकूरची एन्ट्री

T20 World Cup संघात शार्दूल ठाकूरची एन्ट्री

आगामी टी-20 विश्वचषकाला(ICC T20 World Cup) 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. आता या स्पर्धेला अवघे काही दिवस राहिले आहेत. दरम्यान, बीसीसीआयने(BCCI) खेळाडूंच्या यादीत मोठा बदल केला असल्याची माहिती समोर आली आहे.

  नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर: आगामी टी-20 विश्वचषकाला(ICC T20 World Cup) 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. आता या स्पर्धेला अवघे काही दिवस राहिले आहेत. दरम्यान, बीसीसीआयने(BCCI) टीम इंडियाच्या संघात  मोठा बदल केला असल्याची माहिती समोर आली आहे. टीम इंडिया (Team India) हा थेट सुपर-12 मध्ये उतरणाऱ्या संघामधील एक असल्याने 15 ऑक्टोबरपर्यंत संघात बदल करण्याची मुभा भारताला होती. त्यानुसारच पहिला बदल झाला असून  वेगवान गोलंदाज  शार्दूल ठाकूरला (Shardul Thakur) संघात स्थान देण्यात आलं  आहे. तर, असून अष्टपैलू अक्षर पटेलला (Akshar Patel) राखीव खेळाडूंमध्ये बसवण्यात आले आहे. यापूर्वी शार्दुलचा राखीव खेळाडूंमध्ये समावेश होता. पण आता त्याला मुख्य संघात घेण्यात आले आहे. शार्दुलने गेल्या काही दिवसात चमकदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे त्याला टी20 विश्वचषकासाठी संघात स्थान देण्याची मागणी जोरदार होत होती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) याआधीच अंतिम 15 खेळाडूसंह 3 राखीव खेळाडूंची यादी जाहीर केली होती. पण, यामध्ये आता बदल करण्यात आले आहेत.

  टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ

  भारत (India): विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, आर अश्विन राखीव: श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि अक्षर पटेल. तर  भारताने संघ जाहीर केला असून माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला संघाचा मेन्टॉर म्हणून नेमण्यात आलं आहे.

  भारतीय संघाला सरावात मदत करणारे खेळाडू

  आवेश खान, उम्रान मलिक, हर्षल पटेल, लुकमन मेरीवाला, वेंकटेश अय्यर, कर्ण शर्मा, शाहबाज अहमद, के गौथम. भारताच्या सामन्यांचे वेळापत्रक-  सुपर 12 फेरी  24 ऑक्टोबर – भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई ( संध्या- 7.30 वाजता) 31 ऑक्टोबर – भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुबई ( संध्या- 7.30 वाजता) 3 नोव्हेंबर – भारत विरुद्ध अफगाणिस्तान, अबुधाबी ( संध्या- 7.30 वाजता) 5 नोव्हेंबर – भारत विरुद्ध ब गटातील अव्वल संघ, दुबई ( संध्या- 7.30 वाजता) 8 नोव्हेंबर – भारत विरुद्ध अ गटातील अव्वल संघ, दुबई ( संध्या- 7.30 वाजता) बाद फेरी –  10 नोव्हेंबर –  उपांत्य सामना – १, अबुधाबी ( संध्या- 6.00 वाजता) 11 नोव्हेंबर – उपांत्य सामना – २, दुबई ( संध्या- 6.00  वाजता) 14 नोव्हेंबर – अंतिम सामना, दुबई ( संध्या- 6.00  वाजता)
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: T20 cricket, T20 world cup

  पुढील बातम्या