मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'...म्हणून तेव्हा धोनीला कर्णधार करण्यात आलं', शरद पवारांचा खुलासा

'...म्हणून तेव्हा धोनीला कर्णधार करण्यात आलं', शरद पवारांचा खुलासा

महेंद्रसिंग धोनीला (MS Dhoni) टीम इंडियाचा कर्णधार कसं करण्यात आलं, याबाबतचा खुलासा बीसीसीआयचे (BCCI) माजी प्रमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला आहे.

महेंद्रसिंग धोनीला (MS Dhoni) टीम इंडियाचा कर्णधार कसं करण्यात आलं, याबाबतचा खुलासा बीसीसीआयचे (BCCI) माजी प्रमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला आहे.

महेंद्रसिंग धोनीला (MS Dhoni) टीम इंडियाचा कर्णधार कसं करण्यात आलं, याबाबतचा खुलासा बीसीसीआयचे (BCCI) माजी प्रमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 8 मार्च : महेंद्रसिंग धोनीला (MS Dhoni) टीम इंडियाचा कर्णधार कसं करण्यात आलं, याबाबतचा खुलासा बीसीसीआयचे (BCCI) माजी प्रमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला आहे. 2007 साली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) धोनीचं नाव नेतृत्व करण्यासाठी सुचवलं होतं, असं शरद पवार यांनी सांगितलं. 2005 ते 2008 या काळात बीसीसीआय अध्यक्षपद भुषवलं होतं. 2007 सालच्या इंग्लंड दौऱ्यात राहुल द्रविडने (Rahul Dravid) आपल्याला आता टीमचं नेतृत्व करायचं नसल्याचं सांगितलं, यानंतर आपण सचिन तेंडुलकरला टीमचं नेतृत्व करण्याची ऑफर दिली, पण त्याने ही ऑफर स्वीकारली नाही, असं शरद पवार म्हणाले.

'2007 साली भारतीय टीम इंग्लंड दौऱ्यावर गेली होती. त्यावेळी राहुल द्रविड टीमचा कर्णधार होता. मीही त्यावेळी इंग्लंडमध्ये होतो, तेव्हा द्रविड मला भेटायला आला. आता मला भारतीय टीमचं नेतृत्व करायचं नाही, असं द्रविडने मला सांगितलं. नेतृत्वामुळे माझ्या बॅटिंगवर परिणाम होत आहे, त्यामुळे मला कॅप्टन्सीच्या जबाबदारीतून मुक्त करावं, असं द्रविड म्हणाला. यानंतर मी सचिनला टीमचं नेतृत्व करायला सांगितलं, पण त्याने नकार दिला,' असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं.

'जर तूला आणि राहुल द्रविडला टीमचं नेतृत्व करायचं नसेल, तर पुढे काय करायचं? असं मी सचिनला विचारलं. त्यावेळी सचिनने आपल्या देशात आणखी एक खेळाडू आहे, जो टीमचं नेतृत्व करू शकतो. तो दुसरा तिसरा कोणी नसून धोनी आहे. यानंतर आम्ही धोनीला टीमची जबाबदारी दिली,' अशी आठवण शरद पवारांनी सांगितली.

2007 सालच्या वर्ल्ड कपमध्ये द्रविडच्या नेतृत्वात भारतीय टीम ग्रुप स्टेजमध्येच बाहेर पडली. यानंतर टीम इंडियावर जोरदार टीका करण्यात आली. पण त्याच वर्षी धोनीच्या नेतृत्वात भारताने टी-20 वर्ल्ड कप जिंकला. पुढे धोनीला वनडे आणि टेस्ट टीमचं नेतृत्वही देण्यात आलं.

धोनीच्या नेतृत्वात भारताने 2011 सालच्या वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं. तसंच 2013 साली चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकली. आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकणारा धोनी हा जगातला एकमेव कर्णधार आहे. धोनी कर्णधार असतानाच भारतीय टीम टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच नंबर एकवर पोहोचली होती.

धोनीच्या नावावर 195 स्टम्पिंग आहेत. जगातल्या दुसऱ्या कोणत्याही विकेट कीपरला एवढे स्टम्पिंग करता आलेले नाहीत. भारताकडून तो 350 वनडे खेळला, यात त्याचा सर्वाधिक स्कोअर 183 आहे. 2014 साली धोनीने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 90 टेस्टमध्ये त्याने 38.09 च्या सरासरीने 4,876 रन केले. मागच्या वर्षी 15 ऑगस्टला धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

First published:

Tags: BCCI, Cricket, IPL 2021, MS Dhoni, Sharad pawar, Sports