Home /News /sport /

दिग्गज क्रिकेटपटूवर आली वडिलोपार्जित घर विकण्याची वेळ, 39 कोटी 97 लाख आहे किंमत

दिग्गज क्रिकेटपटूवर आली वडिलोपार्जित घर विकण्याची वेळ, 39 कोटी 97 लाख आहे किंमत

स्पिनचा जादूगर म्हणून ओळखला जाणाऱ्या एका दिग्गज क्रिकेटपटूवर वडिलोपार्जित घर विकण्याची वेळ आली आहे.

    सिडनी, 20 नोव्हेंबर : स्पिनचा जादूगर म्हणून ओळखला जाणाऱ्या एका दिग्गज क्रिकेटपटूवर वडिलोपार्जित घर विकण्याची वेळ आली आहे. ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू शेन वॉर्ननं (Shane Warne) स्वत: ही माहिती दिली आहे. वॉर्ननं सोशल मीडियावर असेही लिहिले आहे की हे घर विकल्याबद्दल मी दु: खी आहे. शेन वॉर्न दिग्गज क्रिकेटपटू असून त्यानं 145 कसोटी आणि 194 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात शेननं एकूण 1001 आंतरराष्ट्रीय विकेट घेतल्या आहेत. मुथय्या मुरलीधरननंतर (800) कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा शेन खेळाडू आहे. 51 वर्षीय शेन वॉर्नला जगातील सर्वोत्कृष्ट लेगस्पिनर मानले जाते. शेन वॉर्नच्या गोलंदाजी पुढे दिग्गज फलंदाजही घाबरतात. दिग्गज शेन वॉर्ननं क्रिकेट बरोबरच संपत्तीही कमावली आहे, मात्र तरी त्याला त्याचे आलिशान वडिलोपार्जित घर विकावे लागत आहे. शेननं ट्विटरवर फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. वाचा-ISL 7: कोरोना व्हायरसमध्ये 9 महिन्यांनंतर भारतात होणार ‘ही’ लीग, असे असणार नियम वाचा-तिसऱ्यांदा 'बाबा' झाला RCBचा हा स्टार क्रिकेटपटू, PHOTO शेअर करत दिली गोड बातमी शेन वॉर्नने ट्विट करत, 'होय, आम्ही ब्रिग्टन, व्हिक्टोरियामधील आमचे वडिलोपार्जित घर विकत आहोत. हे वाईट आहे, मात्र मला माहित आहे की, या भव्य घरात राहणारे कुटुंब आनंदी असेल. या घरात आमच्या सुंदर आठवणी आहेत'. दरम्यान या घराची किंमत 39 कोटी 97 लाख असल्याचे सांगितले जात आहे. वाचा-क्रिस गेलची लंका प्रीमियर लीगमधून माघार, कर्णधार बनणारा खेळाडूही बाहेर शेननं 708 टेस्ट विकेट घेतल्या आहेत. शेननं जबरदस्त कामगिरीच्या जोरावर दिग्गज फलंदाजांना हैराण केले होते. शेनला ‘सेंच्युरी ऑफ द बॉल’ चे श्रेयही देण्यात आले होते. वॉर्ननं कसोटीमध्ये 3154 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1018 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्यानं 99 धावा केल्या आहेत.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या