VIDEO : बॉल ऑफ द सेंच्युरीने बदललं वॉर्नचं आयुष्य, त्या विकेटवर पंचही झाले होते हैराण!

VIDEO : बॉल ऑफ द सेंच्युरीने बदललं वॉर्नचं आयुष्य, त्या विकेटवर पंचही झाले होते हैराण!

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नने 1993 च्या अॅशेस मालिकेत टाकेलेला चेंडू बॉल ऑफ द सेंच्युरी म्हणून ओळखला जातो.

  • Share this:

मेलबर्न, 13 सप्टेंबर : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आणि दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न त्याचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त बॉल ऑफ द सेंच्युरीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 26 वर्षापूर्वी वॉर्नने 1993 च्या अॅशेस मालिकेत ओल्ड ट्रॅफर्डवर इंग्लंडच्या माइक गेटिंगचा त्रिफळा उडवला होता. त्या चेंडूला शतकातला सर्वोत्तम चेंडू म्हटलं जातं. एका चेंडूनं वॉर्नचं आयुष्य बदलून टाकलं होतं.

वॉर्नने कसोटी क्रिकेटमध्ये 145 सामन्यात 708 विकेट घेतल्या आहेत. मुथय्या मुरलीधरननंतर कसोटीत सर्वाधिक बळी घेणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये तो दुसऱ्या स्थानावर आहे. मुरलीधरनने 800 विकेट घेतल्या आहेत.वॉर्नने 15 वर्षांच्या क्रिकेटमध्ये अनेकदा चकीत करणारे चेंडू टाकले पण त्याचा बॉल ऑफ द सेंच्युरी मात्र नेहमीच चर्चेत राहिला आहे.

वॉर्नने लेग स्पीनवर माइक गेटिंगला बोल्ड केलं होतं. हा चेंडू जवळपास 90 डीग्रीत वळला होता. वॉर्नचा चेंडू लेग स्टम्पच्या बाहेर पडला आणि तो वाइड जाणार असं वाटल्यानं माइक गेटिंग खेळला नाही. पण चेंडू वळला आणि थेट ऑफ स्टम्प उडवली. हे पाहून फलंदाजासह सर्वच जण हैराण झाले होते. पंचांनाही काही क्षण यावर विश्वास बसला नव्हता.

बाप्पाच्या विसर्जनावेळी उलटली बोट; दुर्घटनेचा VIDEO समोर

First published: September 13, 2019, 1:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading