IPL जिंकून देण्यासाठी कर्णधाराला केले मालक! कोहली, धोनीपेक्षा जास्त होती ‘या’ खेळाडूची कमाई

IPL जिंकून देण्यासाठी कर्णधाराला केले मालक! कोहली, धोनीपेक्षा जास्त होती ‘या’ खेळाडूची कमाई

राजस्थान रॉयल्स संघाच्या कर्णधाराचा धक्कादायक खुलासा. विजेतेपदासाठी खेळाडूला केले मालक.

  • Share this:

मुंबई, 08 डिसेंबर : आयपीएल ही क्रिकेटच्या इतिहासातली सर्वात श्रीमंत लीग म्हणून ओळखली जाते. आयपीएलच्या लिलावात खेळाडूंवर कोट्यावधी रुपयांची बोली लागली जाते. त्यात महागड्या खेळाडूंमध्ये विराट कोहली, एमएस धोनी (एमएस धोनी) सारख्या खेळाडूंचा समावेश होता. पण आयपीएलमध्ये विराट, धोनीपेक्षा राजस्थान रॉयल्सचा प्रशिक्षक शेन वॉर्ननं जास्त कमाई केली. त्याने आयपीएलमधून 85 कोटी कमावले. वॉर्न यांनी स्वतः हा खुलासा केला. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने 2008मध्ये आयपीएलमधील आपल्या गुंतवणूकीविषयी खुलासा केला.

डेली मेलच्या वृत्तानुसार, दिग्गज फिरकी गोलंदाजानं 2006मध्ये क्रिकेटमधून निवृत्त घेतली. परंतु त्याचा निर्णय मागे घेण्यासाठी आयपीएलच्या फ्रेंचायझी राजस्थान रॉयल्सकडून त्याला भारी किंमत मोजावी लागली. त्याने वॉर्नला संघातून निवृत्तीनंतर मैदानात परत येण्यास सांगितले आणि नंतर शेन वॉर्नच्या पुनरागमनाने राजस्थानला आयपीएलचा पहिला विजेता बनविला. वॉर्नने आयपीएल 2008 मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

वाचा-फक्त 19 धावा करत कॅप्टन कोहलीनं रोहितकडून हिसकावले सिंहासन!

राजस्थान रॉयल्सबरोबर केला होता हा करार

जवळपास एक दशकानंतर वॉर्नने आयपीएलच्या पहिल्या सत्रासाठी राजस्थान रॉयल्सशी केलेला करार उघडकीस आला. या करारानुसार फ्रेंचायझीने त्याला सेवानिवृत्तीवरून परत यावे व स्वत: च्या आवडीनुसार संघ चालवा असे सांगितले होते. यासाठी राजस्थानला वॉर्नला केवळ पाच कोटी रुपयेच दिले गेले नाहीत, तर मालकीत खेळण्यासाठी दरवर्षी 0.75टक्के हिस्साही दिला.

वाचा-VIDEO : प्रेक्षकांनी केला जयघोष, तर भरमैदानात रवी शास्त्रींनी संजूवर उचलला हात

सर्वात कमकुवत संघ

वॉर्नच्या म्हणण्यानुसार, त्याची टीम त्या मोसमातील अंडरडॉग टीम होती आणि ती अशी एक टीम होती जी लोकांना क्वचितच आवडली असेल. याशिवाय कागदावरही शेन वॉर्नचा संघ खूप कमकुवत होता. तथापि, या संघाने 2008 मध्ये हे विजेतेपद जिंकले आणि आता 11 वर्षानंतर या संघाची किंमत सुमारे 200 दशलक्ष डॉलर्स झाली आहे. याशिवाय राजस्थान रॉयल्सचे मूल्य येत्या दोन वर्षांत दुप्पट होईल, असा शेन वॉर्नचा विश्वास आहे.

वाचा-VIDEO : ‘माझ्या बहिणीसोबत झोपला खेळाडू’, कर्णधाराचा धक्कादायक खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 9, 2019 06:40 AM IST

ताज्या बातम्या