मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

ऑस्ट्रेलियातील आगीत होरपळलेल्या प्राण्यांसाठी लिलावात काढलेल्या टोपीला विक्रमी किंमत

ऑस्ट्रेलियातील आगीत होरपळलेल्या प्राण्यांसाठी लिलावात काढलेल्या टोपीला विक्रमी किंमत

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉर्नने त्याच्या टोपीचा लिलाव कऱण्याचे जाहीर केल्यानतंर त्यावर कोट्यवधींची बोली लागली होती. धोनीची बॅट आणि ब्रॅडमन यांच्या टोपीलाही इतकी किंमत मिळाली नव्हती.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉर्नने त्याच्या टोपीचा लिलाव कऱण्याचे जाहीर केल्यानतंर त्यावर कोट्यवधींची बोली लागली होती. धोनीची बॅट आणि ब्रॅडमन यांच्या टोपीलाही इतकी किंमत मिळाली नव्हती.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉर्नने त्याच्या टोपीचा लिलाव कऱण्याचे जाहीर केल्यानतंर त्यावर कोट्यवधींची बोली लागली होती. धोनीची बॅट आणि ब्रॅडमन यांच्या टोपीलाही इतकी किंमत मिळाली नव्हती.

    सिडनी, 10 जानेवारी : ऑस्ट्रेलियात गेल्या चार महिन्यांपासून भडकलेल्या आगीत आतापर्यंत 50 कोटी प्राण्यांना जीव गमवावा लागला. जंगले जळून खाक झाली आहेत. आता या प्राण्यांसाठी लोकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नने त्याच्या बॅगी ग्रीन कॅपचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता. शेन वॉर्नच्या या लिलावाच्या घोषणेनंतर बॅगी ग्रीनवर मोठी बोली लावण्यात आली. एक दिवस बाकी असतानाच या कॅपवर विक्रमी 6 लाख डॉलर्सची बोली लागली होती. त्याने डॉन ब्रॅडमन आणि धोनी यांनाही याबाबतीत मागे टाकलं आहे. डॉन ब्रॅडमन यांच्या बॅगी ग्रीन कॅपचा लिलाव जानेवारी 2003 मध्ये झाला होता. तेव्हा 4 लाख 25 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजेच जवळपास 3 कोटी 6 लाख रुपयांत लिलाव झाला होता. 2003 मध्ये मिळालेली ही विक्रमी किंमत होती. ब्रॅडमन यांच्यानंतर धोनीच्या बॅटला विक्रमी किंमत मिळाली होती. 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये धोनीने ज्या बॅटने षटकार मारून विजय मिळवला होता त्याला एक लाख युरो इतकी किंमत मिळाली होती. <blockquote class="twitter-tweet"><p lang="en" dir="ltr">Thankyou so much to everyone that placed a bid &amp; a huge Thankyou / congrats to the successful bidder - you have blown me away with your generosity and this was way beyond my expectations ! The money will go direct to the Red Cross bushfire appeal. Thankyou, Thankyou, Thankyou ❤️ <a href="https://t.co/vyVcA7NfGs">pic.twitter.com/vyVcA7NfGs</a></p>&mdash; Shane Warne (@ShaneWarne) <a href="https://twitter.com/ShaneWarne/status/1215413839614763008?ref_src=twsrc%5Etfw">January 9, 2020</a></blockquote> <script async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"></script> वॉर्नच्या टोपीला त्यापेक्षा जास्त किंमत मिळाली आहे. शेन वॉर्नची टोपी 10 लाख 7 हजार 500 ऑस्ट्रेलियन डॉलरला म्हणजेच जवळपास 4 कोटी 92 लाख 8 हजार रुपयांना विकण्यात आली. वडिलांचं हेल्मेट घालून चिमुकली आली अंत्ययात्रेत, VIDEO पाहून डोळ्यात येतील अश्रू वॉर्नने दोन दिवसांपूर्वी ऑनलाइन लिलाव सुरू केला होता. शेन वॉर्नने 145 कसोटी सामन्यांच्या कारकीर्दीत ही कॅप परिधान केली होती. त्याने कारकीर्दीत 708 बळी घेतले आहेत. या कॅपवर वॉर्नची स्वाक्षरीही मिळणार आहे. तसेच, ऑनलाइन लिलावामधून येणारी रक्कम बुशफायर अपीलला (Bushfire Appeal) दान करण्यात येणार आहे. वाचा : 10000 उंटांना थेट गोळ्या घालून ठार करणार; कारण वाचून व्हाल हैराण ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स स्टेटमध्ये पहिल्यांदा आग लागली. राजधानी मेलबर्न आणि सिडनी याच राज्यात समुद्र किनाऱ्यावर आहेत. इथं 70 लाख लोक राहतात. वेल्सनंतर आग विक्टोरियापर्यंत पोहचली. गेल्या आठवड्यात मल्लकूटातील जंगलाला आगा लागली. यामुळे शहरातील 4 हजार लोकांना स्थलांतर करावं लागलं. जवळपास 1.23 कोटी एकर क्षेत्र आगीत भस्मसाथ झालं आहे. सिडनीच्या ओपेरा हाऊसपेक्षाही आगीचे लोट उंच असल्याचं म्हटलं जात आहे. ही आग विझवण्यासाठी 74 हजार कर्मचारी काम करत आहेत. आगीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जात आहे. आग विझवताना वडिलांचा मृत्यू, 2 वर्षांच्या चिमुकल्याने स्वीकारले शौर्य पदक 176 प्रवाशांच्या विमानावर इराणनेच डागले क्षेपणास्त्र? समोर आला खळबळजनक VIDEO
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Australia

    पुढील बातम्या