सेक्स रॅकेटमध्ये अडकलेल्या दिग्गज खेळाडूवर आता नियम तोडल्यामुळं झाली शिक्षा

सेक्स रॅकेटमध्ये अडकलेल्या दिग्गज खेळाडूवर आता नियम तोडल्यामुळं झाली शिक्षा

अनेक विदेशी खेळाडू हे सेक्स आणि ड्रग्ज रॅकेटमध्ये अडकले होते. यातच आता एक खेळाडू एक नियम मोडल्यामुळं अडचणीत आला आहे.

  • Share this:

सिडनी, 23 सप्टेंबर : क्रिकेटमधील अनेक खेळाडू हे आपल्या आलिशान राहणीमानामुळं ओळखले जातात. यातच्या अनेक विदेशी खेळाडू हे सेक्स आणि ड्रग्ज रॅकेटमध्ये अडकले होते. यातच आता एक खेळाडू एक नियम मोडल्यामुळं अडचणीत आला आहे. या दिग्गज खेळाडूनं क्रिकेटच्या मैदानावर केवळ आपल्या फिरकीच्या जोरावर मोठमोठ्या फलंदाजांना पळता भुई थोडी केलीय. पण हा ऑस्ट्रेलियन खेळाडू जेवढा मैदानावर प्रसिद्ध होता, तेवढाच मैदानाबाहेरही. तो खेळाडू आहे ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न.

ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज शेन वॉर्नवर आता एका वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. शेन वॉर्नवर क्रिकेटमध्ये नाही तर वाहतुकीचे नियम मोडल्यामुळं बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळं शेन वॉर्न आता एक वर्ष गाडी चालवू शकणार नाही आहे. गेल्या दोन वर्षात जवळजवळ सहाव्यांदा शेन वॉर्ननं वाहतुकीचे नियम मोडले आहेत. वॉर्ननं लंडनच्या रस्त्यांवर दिलेल्या गतीपेक्षा जास्त गतीनं गाडी चालवल्यामुळं शिक्षा देण्यात आली आहे. नियमांनुसार गाडी 64 किमीपेक्षा जास्त गतीनं चालवण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळं शेन वॉर्नला शिक्षा देण्यात आली आहे.

वाचा-सर्बियन मॉडेलच्या प्रेमात पडला टीम इंडियाचा स्टार खेळाडू, सोशल मीडियावर कबुली

25 हजार रुपयांचा दंडही बसला

50 वर्षांचा शेन व़ॉर्न शिक्षा सुनावताना न्यायालयात हजार होता. याआधी शेन वॉर्ननं स्पीड लिमीट आणि पेनल्टी पॉईंट्स अशा पाच वेळा दंड भरले आहेत. एका वर्षांच्या बंदी बरोबरच वॉर्नला 25 हजार रुपयांचा दंडही भरावा लागणार आहे. यावेळी न्यायाधिशांनी, या शिक्षेचा उद्देश शिक्षा देणे नाही तर लोकांच्या सुरक्षेचा विचार करणे आहे. याआधी नियम मोडल्यामुळं शेन वॉर्नच्या खात्यात 15 पॉइंट्स होते. दरम्यान न्यायाधिशांनी आणखी 3 पॉइंट्स टाकले. त्यामुळं वॉर्नवर एका वर्षांची बंदी लादण्यात आली आहे.

वाचा-क्रिकेटपटूनं शेअर केला अर्धनग्न फोटो, सोशल मीडियावर झाला ट्रोल

नेहमीच वादात असतो वॉर्न

वाद आणि शेन वॉर्न यांचे फार जुने संबंध आहेत. अॅशेस मालिकेत समालोचन करणारा शेन वॉर्न नेहमीच वादात अडकत असतो. आता अॅशेस मालिकेदरम्यान इंग्लंडमध्ये शेन वॉर्न त्याची गर्लफ्रेण्ड आणि 2 सेक्स वर्कर यांच्यासोबत पार्टी करताना दिसला. शेन वॉर्न चक्क खिडकी आणि दरवाजे उघडून पार्टी करत होते. त्यामुळं शेजाऱ्यांना चक्क पोलिसांना सांगावे लागले. त्यानंतर त्यांनी आवाज कमी केला. आपल्या रंगीन सवयींमुळं शेन वॉर्नला वर्ल्ड कपलाही मुकावे लागले होते. 2003 साली विश्वकप संघाची घोषणा केल्यानंतर, अव्वल क्रमांकावर असलेल्या या गोलंदाजाला ड्रग्ज घेतल्याप्रकरणी आरोपी ठरवण्यात आले होते. वॉर्ननं प्रतिबंधित डायूरेटिक्स या ड्रग्जचं सेवन केलं होतं. त्यामुळं त्याला मायदेशी परतावं लागलं होतं.

वाचा-फलंदाजाचा जीवघेणा शॉट; थोडक्यात वाचला गोलंदाज, पाहा खतरनाक VIDEO

स्मिता गोंदकरने दिली ग्रॅण्ड पार्टी! सेलिब्रिटींची फुल टू धमाल! पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 23, 2019 07:40 PM IST

ताज्या बातम्या