अष्टपैलू खेळाडूविरुद्ध LIVE चॅटमध्ये वापरले अश्लील शब्द, हातात तलवार घेऊन दिली ठार मारण्याची धमकी

अष्टपैलू खेळाडूविरुद्ध LIVE चॅटमध्ये वापरले अश्लील शब्द, हातात तलवार घेऊन दिली ठार मारण्याची धमकी

अलीकडेच शाकिब काली पूजा करण्यासाठी कोलकाताला आला होता, त्याचा राग व्यक्त करून या इसमानं त्याला ठार मारण्याची धमकी दिली.

  • Share this:

कोलकाता, 17 नोव्हेंबर : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) घातलेल्या बंदीनंतर पुनरागमन करण्यासाठी सज्ज असलेल्या बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसनच्या (Shakib al-hasan) अडचणी वाढल्या आहेत. शाकिबला फेसबुक लाइव्ह दरम्यान जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. फेसबुक लाइव्ह दरम्यान बांगलादेशी अष्टपैलू खेळाडूला धमकी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे अलीकडेच शाकिब काली पूजा करण्यासाठी कोलकाता इथं पोहोचला होता. या कारणास्तव, त्याला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.

मोहसिन तालुक्तर नावाच्या व्यक्तीने त्याच्या फेसबुक अकाऊंटवर लाइव्ह व्हिडिओ दरम्यान शाकिबला ठार मारण्याची धमकी दिली. त्याने या क्रिकेटरवर आपला रोष व्यक्त केला. त्यानं या व्हिडीओमध्ये अत्यंत अश्लील भाषेचा वापर केला. हातात तलवार घेऊन शाकिबला ठार मारण्याची धमकी या व्यक्तीनं दिली आहे.

वाचा-भारताविरुद्ध शूज न घालता मैदानात उतरणार ऑस्ट्रेलियाचा संघ, कारण वाचून कराल सलाम

आपली ओळख सांगताना मोहसिन म्हणाला की, या खेळाडूचा जीव घेण्यास जर आपल्याला ढाकाला जावे लागले तर तो तेथेही जाऊ शकतो. सोमवारी 16 नोव्हेंबरला पुन्हा लाइव्ह असताना त्या व्यक्तीने शाकिब अल हसनला संपूर्ण देशाची माफी मागण्यास सांगितले.

वाचा-पाकिस्तान प्रीमिअर लीगमध्ये दिसली 'मुंबई इंडियन्स', PHOTO पाहून चाहते हैराण

मोहसीनने व्हिडीओमध्येही हे स्पष्ट केले होते की हा व्हिडीओ तो स्वत: बनवित आहेत आणि कोणाच्या दबावाखाली नाहीत. या घटनेनंतर फेसबुकवर शाकिबनं लाइव्ह करत याबाबत स्पष्टीकरण दिले. शाबिक म्हणाला की तो, काली पूजेच्या उद्धटानासाठी नाही तर केवळ त्यात सामिल होण्यासाठी इथं उपस्थित राहिला होता.

वाचा-धोनी करणार असलेला 'कडकनाथ'चा व्यवसाय नेमका काय आहे?

मोहसिन तालुक्तर या युजरच्या व्हिडीओची लिंक सायबर सेलकडे देण्यात आली आहे, अशी माहिती सियेतचे अतिरिक्त उपायुक्त बीएम अशरफ उल्ला ताहेर यांनी दिली. या व्हिडीओबाबत त्वरित चौकशी सुरू केली आहे. त्याविरूद्ध लवकरच कायदेशीर कारवाई केली जाईल.

Published by: Priyanka Gawde
First published: November 17, 2020, 1:19 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading