दिग्गज क्रिकेटपटूनं लपवली फिक्सिंगची ऑफर, ICC करणार मोठी करवाई

युवा खेळाडूंनंतर आता दिग्गज अडकले फिक्सिंगच्या जाळ्यात, आयसीसी लावणार बॅन.

News18 Lokmat | Updated On: Oct 29, 2019 02:19 PM IST

दिग्गज क्रिकेटपटूनं लपवली फिक्सिंगची ऑफर, ICC करणार मोठी करवाई

ढाका, 29 ऑक्टोबर : भारत-बांगलादेश यांच्यात 2 नोव्हेंबरपासून टी-20 आणि कसोटी मालिका होत आहे. मात्र आता आलेल्या एका बातमीमुळं संपूर्ण क्रिकेट जगतात खळबळ माजली आहे. क्रिकेटमध्ये फिक्सिंगचे प्रकार सतत घडत असतात, मात्र असे असले तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फिक्सिंगच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी आयसीसीनं कडक नियम केले आहेत. मात्र आता दिग्गज क्रिकेटपटू फिक्सिंगच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू आणि बांगलादेश क्रिकेट संघाचा कर्णधार शाकिब-अल-हसनच्या अडचणी वाढल्या आहेत. याआधी खेळाडूंसोबत संप केल्यामुळं बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून त्याच्यावर कारवाई केली जाऊ शकते. मात्र आता शाकिबवर आयसीसीकडून थेट बॅनची कारवाई होणार आहे. बांगलादेशच्या वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार शाकिबला मॅच फिक्सिंगची ऑफर देण्यात आली होती. ही माहिती शाकिबनं आयसीसीपासून लपवली, त्यामुळं त्याच्यावर दीड वर्षांच्या बंदीची कारवाई होऊ शकते.

वाचा-टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या, बांगलादेशचे खेळाडू सोडणार भारत!

शाकिबनं लपवली फिक्सिंगची ऑफर

बांगलादेशच्या दैनिकाच आलेल्या बातमीनुसार, शाकिबला दोन वर्षांआधी फिक्सिंगची ऑफर मिळाली होती. सामन्याआधी बुकीनं शाकिबला संपर्क केला बोता. आयसीसीच्या नियमांनुसार फिक्सिंगची ऑफर मिळताच आयसीसी किंवा संबंधित अधिकाऱ्यांना देणे बंधनकारक असते. मात्र शाकिबनं याबाबत माहिती दिली नसल्यामुळं त्याच्यावर कारवाई होऊ शकते.

Loading...

वाचा-BREAKING : कॅप्टन कोहलीच्या जीवाला धोका, दहशतवाद्यांकडून धमकी

आयसीसीच्या लाचलुचपत विभाग करणार शाकिबची चौकशी

रिपोर्टनुसार शाकिबला आलेल्या फिक्सिंगच्या ऑफरी भनक आयसीसीच्या लाचलुचपत विभागाला लागल होती. याबाबत आयसीसीनं शाकिबची चौकशी केली. ही बाब शाकिबनं गंभीरतने घेतली नाही. त्यामुळं आयसीसीला आता त्याच्यावर कारवाई करणार आहे. एवढेच नाही तर शाकिबची ट्रेनिंगही वेगळी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

वाचा-कुटुंबासाठी कायपण! भावाच्या वरातीसाठी स्टार क्रिकेटपटूनं सोडलं मैदान

भारत दौऱ्यावर जाणार नाही शाकिब?

शाकिब-अल-हसननं वर्ल्ड कपमध्ये शानदार कामगिरी केली होती. मात्र या स्पर्धेनंतर शाकिबच्या अडचणी वाढल्या आहेत. शाकिबच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 30 ऑक्टोबरला भारतात येणार होता. मात्र खेळाडूंसोबत संप केल्यामुळं क्रिकेट बोर्डाकडून कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. आता पुन्हा शाकिबच्या अडचणी वाढल्या आहेत. शाकिबवर बंदीची कारवाई केल्यास, भारत दौऱ्यावर येऊ शकत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 29, 2019 02:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...