सचिन, जयसुर्या आणि लारालाही नाही जमलं ते ‘या’ वेस्ट इंडिज फलंदाजानं करुन दाखवलं

सचिन, जयसुर्या आणि लारालाही नाही जमलं ते ‘या’ वेस्ट इंडिज फलंदाजानं करुन दाखवलं

आयर्लंड, बांगलादेश आणि वेस्टइंडिज यांच्यात सुरु असलेल्या सामन्यात या फलंदाजानं तुफान फलंदाजी केली.

  • Share this:

दुबलीन, 08 मे : वेस्ट इंडिजचा सलामीचा फलंदाज शाई होप यानं क्रिकेटच्या इतिहासात आपलं नाव अजरामर केलं आहे, तेही केवळ एका विक्रमांना. त्याचा हा विक्रम खुपच खास आहे, कारण आतापर्यंत दिग्गज सलामीवीरांनाही आजपर्यंत हा विक्रम करता आलेला नाही. मंगळवारी बांगलादेश विरोधात झालेल्या सामन्यात या वेस्ट इंडिज फलंदाजानं 109 धावांची शतकी खेळी केली. ही खेळी करताच वेस्ट इंडिजचा शानदार सलामीवील शाई होप यानं चक्क चौथ्यांदा ओपनिंग करताना शतक लगावले आहे.

बांगलादेशच्याआधी होपनं आयर्लंड विरोधात 170ची खेळी केली होती. तर, मागच्या वर्षी 2018मध्ये बांगलादेश विरोधात झालेल्या एकदिवसीय सामन्यात 3 एकदिवसीय सामन्यात 2 दोन वेळा शतक ठोकलं होतं. एवढचं नाही तर, होपनं सलामीशिवाय केवळ 6 सामने खेळले आहेत. यात 164.25च्या सरासरीनं 657 धावा केल्या आहेत. सुरुवातीच्या दोन सामन्यात त्यानं अर्धशतक लगावलं होतं, तर त्यानंतर सलग चार सामन्यात त्यानं शतकी खेळी केली.वाचा-IPL 2019 : आऊट झाल्यानंतर रोहितची मैदानात एण्ट्री, धोनीही झाला शॉक

आयर्लंड, बांगलादेश आणि वेस्टइंडिज यांच्यात सुरु असलेल्या सामन्यात शाईनं तुफान फलंदाजी केली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजच्या शाई होप आणि जॉन कॅपबेल या जोडीने पहिल्या विकेटसाठी विक्रमी 365 धावांची भागिदारी केली आहे. वनडे क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या विकेटसाठीची ही सर्वोच्च भागिदारी ठरली आहे. इतक नव्हे तर कोणत्याही विकेटसाठी दुसऱ्या क्रमांकाची भागिदारीचा मान होप आणि कॅपबेल यांनी स्वत:च्या नावावर केला आहे.

वाचा- IPL 2019 : सामना जिंकला मुंबईनं, पण चर्चा मात्र चेन्नईच्या ‘या’ खेळाडूची

वनडेमध्ये पहिल्या विकेटसाठीच्या सर्वोच्च भागिदारीचा विक्रम पाकिस्तानच्या इमाम उल हक आणि फखर जमां यांच्या नावावर होता. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 304 धावांची भागिदारी केली होती. हा विक्रम आता होप आणि कॅपबेल यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. तर कोणत्याही विकेटसाठीचा सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांनी केलेल्या 331 धावांच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च भागिदारीचा विक्रम होप आणि कॅपबेल यांनी मागे टाकला आहे. दरम्यान मंगळवारी झालेल्या सामन्यात वेस्टइंडिजने प्रथम फलंदाजी करत 50 ओव्हरमध्ये 261 केल्या.


वाचा-चेन्नईच्या फलंदाजांच्या 'या' चुका मी हेरल्या : सुर्यकुमार यादव

VIDEO: धारदार शस्त्रांनी घरफोडी, थरकाप उडवणारी घटना CCTVमध्ये कैद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2019 03:13 PM IST

ताज्या बातम्या