वनडे क्रिकेटमध्ये ऐतिहासिक विश्वविक्रमाची नोंद, 'या' जोडीने मोडला पाकचा विक्रम!

वनडे क्रिकेटमध्ये ऐतिहासिक विश्वविक्रमाची नोंद, 'या' जोडीने मोडला पाकचा विक्रम!

एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात एका ऐतिहासिक विक्रमाची नोंद झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 05 मे: क्रिकेटमध्ये जवळ जवळ प्रत्येक सामन्यात कोणते ना कोणते विक्रम होत असतात. पण काही विक्रम हे ऐतिहासिक असे असतात. अशाच एका ऐतिहासिक विक्रमाची नोंद झाली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजच्या शाई होप आणि जॉन कॅपबेल या जोडीने पहिल्या विकेटसाठी विक्रमी 365 धावांची भागिदारी केली आहे. वनडे क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या विकेटसाठीची ही सर्वोच्च भागिदारी ठरली आहे. इतक नव्हे तर कोणत्याही विकेटसाठी दुसऱ्या क्रमांकाची भागिदारीचा मान होप आणि कॅपबेल यांनी स्वत:च्या नावावर केला आहे.

वनडेमध्ये पहिल्या विकेटसाठीच्या सर्वोच्च भागिदारीचा विक्रम पाकिस्तानच्या इमाम उल हक आणि फखर जमां यांच्या नावावर होता. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 304 धावांची भागिदारी केली होती. हा विक्रम आता होप आणि कॅपबेल यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. तर कोणत्याही विकेटसाठीचा सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांनी केलेल्या 331 धावांच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च भागिदारीचा विक्रम होप आणि कॅपबेल यांनी मागे टाकला आहे.

VIDEO : धोनीचा ‘गुरुमंत्र’, एका रात्रीत पलटला रैनाचा खेळ

होप आणि कॅपबेल यांनी आयर्लंडविरुद्ध 47.2 षटकात 365 धावा करत हा विक्रम नोंदवला. या भागिदारीत कॅपबेलने 137 चेंडूत 179 धावा केल्या. यात 15 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. तर विकेटकिपर आणि आक्रमक फलंदाज असलेल्या होपने 152 चेंडूत 22 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 170 धावांची खेळी केली. या दोघांच्या विक्रमी भागिदारीच्या जोरावर वेस्ट इंडिजने 50 षटकात 3 बाद 381 धावांचा डोंगर उभा केला.

पाकिस्तानचा विक्रम मोडला

होप आणि कॅपबेल यांनी पाकिस्तानच्या इमाम उल हक आणि फखर जमां या जोडीचा विक्रम मोडला. हा विक्रम गेल्यावर्षी जुलै महिन्यात झिम्बाब्वेविरुद्ध करण्यात आला होता. त्यात इमानने 113 तर जमांने नाबाद 210 धावा केल्या होत्या. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 304 धावा केल्या. याआधी हा विक्रम श्रीलंकेचा सनथ जयसूर्या आणि उपुल थरंगा यांच्या जोडीच्या नावावर होता. त्यांनी 2006मध्ये लीड्स येथे 286 धावांची भागिदारी केली होती.

IPL 2019 : कसोटी नाही तर टी-20 मधलं खणखणीत नाणं, दिल्लीसाठी ठरला हुकुमी एक्का

गेल-सॅम्यूल्सचा विक्रम थोडक्यात वाचला

आयर्लंडविरुद्ध होप आणि कॅपबेल ज्या पद्धतीने खेळत होते त्यावरून दोघेही 50 षटके खेळतील असे वाटत होते. पण तसे झाले नाही. कॅपबेल 179 बाद झाला. या सामन्यात वेस्ट इंडिजची पहिली विकेट 47.3 चेंडूत पडली. होप आणि कॅपबेल या जोडीला आणखी एक विक्रम स्वत:च्या नावावर करण्याची संधी होती. कोणत्याही विकेटसाठी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ख्रिस गेल आणि मार्लन सॅम्यूल्स यांच्या नावावर आहे. त्यांनी 2015मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध 372 धावांची भागिदारी केली होती.

भारतीयांनी देखील केलेत विक्रम

भारतीय संघाचा विचार केल्यास पहिल्या विकेटसाठी सौरभ गांगुली आणि सचिन तेंडुलकर यांनी सर्वोच्च भागिदारी केली होती. सौरभ-सचिन जोडीने 2001मध्ये केनियाविरुद्ध पहिल्या विकेटसाठी 258 धावा केल्या होत्या. सध्या पहिल्या विकेटसाठीच्या सर्वोच्च भागिदारीच्या यादीत सौरभ-सचिनची जोडी 7व्या क्रमांकावर आहे. याशिवाय कोणत्याही विकेटसाठीच्या सर्वोच्च भागिदारीचा विचार केल्यास सचिन तेंडुलकर-राहुल द्रविड जोडीने 1999 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या विकेटसाठी 331 धावा केल्या होत्या. आज हा विक्रम वनडे क्रिकेटमधील तिसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च भागिदारी आहे.

SPECIAL REPORT : मराठी सिरीअलमधील रिक्षा चालवणाऱ्या अभिनेत्रीची कहाणी

First published: May 5, 2019, 8:57 PM IST
Tags: shai hope

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading