कोलकाता, 06 एप्रिल : आद्रे रसेलसमोर कोणताही गोलंदाज टिकू शकत नाही, हेत खरं, याती प्रचिती बंगळुरू विरूद्धच्य सामन्यात पुन्हा आली. बंगळुरू संघानं कोलकाता संघाला दिलेलं 205 धावांचे आव्हान रसेलच्या वादळानं चुटकीसरशी पार केलं. रसेलने 13 चेंडूंत 7 खणखणीत षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने नाबाद 48 धावा केल्या. कोलकाताने 206 धावांचे लक्ष्य पाच चेंडू व पाच विकेट राखून पार करत अविश्वसनीय विजय मिळवला.
And you guys in the Dugout who said game/set/& match......u may know your cricket but you don’t know @Russell12A !!! WOW u CHAMPION. This calls for Wine my MuscleMan!
बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आलेल्या रसेलच्या वादळाचं कौतुक कोलकाता संघाचा सह मालक शाहरुख खाननेही केले. त्यानं तर चक्क बाहुबलीच्या शैलीत रसेलचं कौतुक केलं. शाहरुखनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. त्यावर त्यानं, '' कोलकाता संघाने सर्वोत्तम खेळ केला. ख्रिस लीन, नीतीश राणा, रॉबिन उथप्पा यांचीही फलंदाजी कौतुकास्पद होती. पण, रसेलचा हा फोटो या कौतुकांपलीकडचा आहे, याच्याशी तुम्हीही सहमत असाल.''
बाहुबली चित्रपटाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही शाहरुख खानच्या त्या ट्विटची दखल घेतली गेली आणि त्यांनीही रसेलचे कौतुक केलं. आतापर्यंतच्या सामन्यात रसेलचे हेच षटकार प्रतिस्पर्ध्यांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचं समोर आलं आहे. आयपीएलच्या या हंगामात रसेलनं 22 षटकार ठोकले आहेत.