विराटसमोर आफ्रिदी झाला 'नतमस्तक', सोशल मीडियावरून केलं कौतुक

विराटसमोर आफ्रिदी झाला 'नतमस्तक', सोशल मीडियावरून केलं कौतुक

पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीनं विराट कोहलीच्या खेळाचं कौतुक केलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 सप्टेंबर : भारताचा कर्णधार विराट कोहलीला रनमशिन असंही म्हटलं जातं. त्याने एकदिवसीय, टी20 आणि कसोटीतदेखील एकापाठोपाठ एक असे अनेक विक्रम मोडले आहेत. क्रिकेटच्या तीनही प्रकारात 50 पेक्षा जास्त सरासरीनं धावा करणारा विराट जगातील एकमेव फलंदाज आहे. विराटनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात 52 चेंडूत नाबाद 72 धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर भारतानं विजय मिळवला. विराट कोहलीला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. सध्या त्याच्यापेक्षा एका प्रकारात सर्वाधिक सरासरीने धावा करणारे अनेक फलंदाज आहेत. मात्र, कोणताही फलंदाज तिन्ही प्रकारात 50 पेक्षा जास्त सरासरीनं धावा करू शकलेला नाही.

विराटच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कामगिरीनंतर पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीसुद्धा त्याचा चाहता झाला. आफ्रिदी विराटच्या खेळीसमोर नतमस्तक झाला असून त्यानं म्हटलं की, अभिनंदन विराट, तु एक मोठा खेळाडू आहेस. अशीच कामगिरी करत राहण्यासाठी शुभेच्छा. आशा आहे की यापुढेही जगभरातील चाहत्यांचे मनोरंजन करत राहशील.

विराट हिटमॅन रोहित शर्माला मागे टाकून टी20 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱा फलंदाज ठरला आहे. रोहित शर्मा फक्त 7 धावांनी मागे आहे. त्यामुळे यापुढे दोघांमध्ये स्पर्धा असेल.

विराट कोहलीच्या 66 डावात 2 हजार 441 धावा झाल्या आहेत. तर रोहित शर्माने 89 डावात 2 हजार 434 धावा झाल्या आहेत. रोहित शर्मानंतर या यादीत न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टिल आहे. त्याच्या 75 डावात 2 हजार 283 धावा झाल्या आहेत. तर पाकिस्तानचा शोएब मलिक 104 डावात 2 हजार 263 धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

विराट कोहलीनं फक्त 71 सामन्यात ही कामगिरी केली आहे. तर रोहित शर्माला मात्र 26 सामने जास्त खेळावे लागले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 सामन्यात त्यानं 2 षटकारांसह 12 धावा केल्या. पुढचा सामना 22 सप्टेंबरला बेंगळुरूत होणार आहे.

VIDEO: उदयनराजेंनी साताऱ्याची पगडी घालून मोदींचं केलं स्वागत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2019 02:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading