मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

वाढदिवशीही ट्रोल झाला शाहिद आफ्रिदी, पाहा काय ट्विट केलं

वाढदिवशीही ट्रोल झाला शाहिद आफ्रिदी, पाहा काय ट्विट केलं

पाकिस्तानी टीमचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) कायमच चर्चेत असतो. आज म्हणजेच 1 मार्चला त्याचा वाढदिवस आहे. आफ्रिदीने त्याच्या वाढदिवसानिमित्त एक ट्विट केलं, यानंतर त्याला वयावरून (Shahid Afridi Age) सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 1 मार्च : पाकिस्तानी टीमचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) कायमच चर्चेत असतो. आज म्हणजेच 1 मार्चला त्याचा वाढदिवस आहे. आफ्रिदीने त्याच्या वाढदिवसानिमित्त एक ट्विट केलं, यानंतर त्याला वयावरून सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. शाहिद आफ्रिदीने ट्विटमध्ये त्याचं वय (Shahid Afridi Age) 44 वर्ष सांगितलं आहे, यानंतर ट्रोलर्सनी त्याच्यावर निशाणा साधला.

शाहिद आफ्रिदी आता त्याचं वय 44 सांगत आहे, पण त्याच्या आत्मचरित्रात हेच वय 46 सांगण्यात आलं आहे. काही वेबसाईटच्या वृत्तानुसार त्याचं वय 41 आणि 40 आहे. आफ्रिदीची वेगवेगळी वयं समोर येत असल्यामुळे त्याला ट्रोल करण्यात येत आहे. याआधी आफ्रिदीने त्याचं आत्मचरित्र गेम चेंजर मध्येही त्याच्या वयाबाबत खुलासा केला होता. कागदपत्रांवर असलेल्या वयापेक्षा माझं वय खूप जास्त आहे. कागदावरचं वय आणि माझं खरं वय यात 5 वर्षांचा फरक आहे, असं आफ्रिदी म्हणाला होता.

आता आफ्रिदीने त्याच्या वाढदिवशी ट्विट केलं. 'जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबाबत धन्यवाद. आज 44 वर्षांचा झालो. माझं कुटुंब आणि माझे चाहते, हीच माझी संपत्ती आहे. सध्या मुल्तानसोबत कार्यकाळाचा आनंद घेत आहे. मुल्तान सुल्तानच्या सगळ्या प्रशंसकांसाठी मॅच जिंकण्याची अपेक्षा करतो,' असं ट्विट आफ्रिदीने केलं. पण या ट्विटनंतर त्याचं ट्रोलिंग करण्यात येत आहे.

शाहिद आफ्रिदीने 2 ऑक्टोबर 1996 साली केनियाविरुद्ध आपल्या वनडे करियरची सुरूवात केली होती. पण या मॅचमध्ये त्याला बॅटिंगची संधी मिळाली नाही. यानंतर दुसरी वनडे तो श्रीलंकेविरुद्ध खेळला, या वनडेमध्ये त्याने फक्त 37 बॉलमध्ये शतक पूर्ण करत विश्वविक्रम केला.

आफ्रिदी पाकिस्तानसाठी 27 टेस्ट खेळला, यात त्याने 36.51 च्या सरासरीने 1,716 रन केले आणि 48 विकेट घेतल्या. त्याने 398 वनडेमध्ये 23.57 च्या सरासरीने 8,064 रन केले आणि 395 विकेट घेतल्या. 99 टी-20 मॅचमध्ये त्याने 17.92 च्या सरासरीने 1,416 रन केले आणि 98 विकेटही मिळवल्या.

First published: