'मुलींनी चार भिंतीच्या आत खेळावं', आफ्रिदी पुन्हा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

'मुलींनी चार भिंतीच्या आत खेळावं', आफ्रिदी पुन्हा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

आफ्रिदीने त्याच्या आत्मचरित्रात मुलींनी खेळण्याबद्दल घेतलेल्या भूमिकेनंतर त्याच्यावर टीका केली जात आहे.

  • Share this:

इस्लामाबाद, 11 मे : पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी आतापर्यंत अनेक कारणांनी वादात अडकला आहे. आताही तो आत्मचरित्रामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. यात केलेल्या खळबळजनक गौप्यस्फोटामुळे त्याला टीकेचा सामना करावा लागत आहे. पुस्तकात मुलींच्या खेळण्याबद्दल व्यक्त केल्या मतानंतर आता तो नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे.

शाहिद आफ्रिदीने त्याच्या गेम चेंजर या पुस्तकात म्हटलं आहे की, तो मुलींना कोणत्याही मैदानी खेळांमध्ये सहभागी होऊ देत नाही. याबद्दल आपण पत्नीशी बोललो असून तीसुद्धा माझ्या मताशी सहमत आहे. मुलींना खेळायला जाऊ द्यायचं की नाही याबाबत पत्नीचं मत विचारात घेऊन निर्णय घेतल्याचं आफ्रिदीनं पुस्तकात म्हटलं आहे. यावर फेमिनिस्टना जे म्हणायचं असेल ते म्हणूदेत मात्र रुढी परंपरांचे पालन करताना मी हा निर्णय घेतला असल्याचं आफ्रिदीने स्पष्ट केलं आहे.

मुली खेळू शकतात पण फक्त चार भिंतीच्या आत. त्या कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी खेळू शकत नाहीत असं आफ्रिदीने म्हटलं आहे. शाहिद आफ्रिदीच्या या कृतीबद्दल त्याला सोशल मीडि्यावर ट्रोल करण्यात आलं.

याआधी आफ्रिदीने भारताचा माजी क्रिकेटर गौतम गंभीरसोबत पंगा घेतला. त्याने गंभीरला पाकिस्तानात येऊन उपचार करण्याचा सल्ला दिला होता. दोघांमध्ये 2007 मध्ये वाद झाला होता. तेव्हा आयसीसीने आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल दोघांवरही दंडाची कारवाई केली होती.

वाचा- आयपीएलमुळं भंगलं 'या' खेळाडूचं वर्ल्ड कप खेळण्याचं स्वप्न, पण मुंबई इंडियन्स करणार मदत

वाचा- IPL 2019 : 'हे' चार भारतीय खेळाडू ठरवतील फायनलचं भवितव्य

SPECIAL REPORT: रायगड: राज ठाकरे इफेक्ट शिवसेना खासदाराला हॅट्रीकपासून रोखणार का?

First published: May 11, 2019, 5:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading