Home /News /sport /

कोणते क्रिकेटपटू आवडतात? आफ्रिदीच्या लिस्टमध्ये केवळ एक भारतीय

कोणते क्रिकेटपटू आवडतात? आफ्रिदीच्या लिस्टमध्ये केवळ एक भारतीय

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीला (Shahid Afridi) कोणते क्रिकेटपटू प्रभावित करतात आणि कोणत्या खेळाडूंचा खेळ बघायला आवडतो? असा प्रश्न विचारण्यात आला.

    मुंबई, 4 जुलै : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीला (Shahid Afridi) कोणते क्रिकेटपटू प्रभावित करतात आणि कोणत्या खेळाडूंचा खेळ बघायला आवडतो? असा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्याने जगभरातल्या काही क्रिकेटपटूंची नावं घेतली, पण यात फक्त एकाच भारतीय क्रिकेटपटूचा समावेश आहे. 1996 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या आफ्रिदीने अनेक रेकॉर्ड केले आणि पाकिस्तानला बरेच सामने जिंकवून दिले. 1996 सालीच त्याने वनडेमध्ये सगळ्यात जलद शतक करण्याचा विक्रम केला होता. 2014 साली कोरे अंडरसनने (Core Anderson) 36 बॉलमध्ये शतक करून आफ्रिदीचा हा विक्रम मोडला, यानंतर 2015 साली एबी डिव्हिलियर्सने (Ab de Villiers) 31 बॉलमध्येच शतक केलं. शाहीद आफ्रिदीला कोणाचा खेळ बघणं आवडतं? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्याने आपल्याच देशाच्या इंजमाम उल हक (Inzamam Ul Haq) आणि सईद अन्वर (Saeed Anwar) यांच्यासह इतर देशांच्या खेळाडूंची नावं घेतली. बीस्पोर्ट्स पाकिस्तान युट्यूब चॅनलवर 'खेलो आजादी से' नावाच्या शोमध्ये आफ्रिदी बोलत होता. 'सुरुवातीच्या वर्षांमध्ये मला इंजमाम आणि सईद अन्वरने प्रभावित केलं. मला त्यांच्यासारखं खेळण्याची इच्छा होती. त्यांना टीव्हीसमोर बसून बघायचो. त्यांच्यासोबत खेळण्याचं माझं स्वप्न पूर्ण झालं. दुसऱ्या देशांच्या खेळाडूंमध्ये ब्रायन लारा (Brain Lara) आणि ग्लेन मॅकग्रा होते,' असं आफ्रिदी म्हणाला. आफ्रिदीने फखर जमान (Fakhar Zaman) आणि बाबर आझमचंही (Babar Azam) कौतुक केलं, तसंच एबी डिव्हिलियर्सचंही नाव घेतलं. 'सध्याच्या पिढीमध्ये एबी डिव्हिलियर्स, विराट कोहली (Virat Kohli), बाबर आजम असे खेळाडू आहेत. फखर जमानही चांगली सुरुवात केली तर तो त्याच्या जीवावर मॅच जिंकवून देऊ शकतो, पण त्याच्यात सातत्याची कमी आहे,' असं वक्तव्य आफ्रिदीने केलं. पाकिस्तानकडून आफ्रिदीने टेस्ट क्रिकेटमध्ये 1,716 रन केले आणि 48 विकेट घेतल्या, तर वनडेमध्ये त्याला 8,064 रन करता आले आणि 395 विकेट मिळाल्या.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, India, Pakistan, Shahid Afridi, Virat kohli

    पुढील बातम्या