मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'एक दिवस आधीच शाहरुख खानशी बोललो, पण..' पाहा काय म्हणाला आफ्रिदी

'एक दिवस आधीच शाहरुख खानशी बोललो, पण..' पाहा काय म्हणाला आफ्रिदी

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो बॉलीवूडचा किंग शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्याबाबत बोलत आहे.

मुंबई, 13 मे : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो बॉलीवूडचा किंग शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्याबाबत बोलत आहे. आयपीएलमध्ये शाहरुख खान आणि प्रीती झिंटा हे स्टार जोडले गेले आहेत, तुझी आणि त्यांची भेट होते का? असा प्रश्न आफ्रिदीला विचारण्यात आला. तेव्हा माझं आणि शाहरुखचं एक दिवस आधीच फोनवर बोलणं झालं, माझी आणि त्याची भेटही झाली असती, पण मी त्याला भेटायला एवढा बेताब नाही. जर एखादा कार्यक्रम किंवा सोहळा असेल तर भेट होते, अशी प्रतिक्रिया आफ्रिदीने दिली.

बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम करायला आवडेल का? असा प्रश्नही आफ्रिदीला विचारण्यात आला. तेव्हा क्रिकेट खेळायला कसातरी वेळ मिळतोय, त्यात तुम्हाला वाटतंय मी चित्रपटातही काम करू? असं आफ्रिदी म्हणाला. याचसोबत त्याने पाकिस्तानमधली बिर्याणी आणि हैद्राबादमधील बिर्याणी यातला फरकही आफ्रिदीने सांगितला.

'मी भारतात खूप खाल्लं आहे. बिर्याणी माझी आवडती डिश आहे. दोन्ही बिर्याणींमध्ये फार फरक नाही, दोघी तिखट असतात. फरक फक्त तुम्ही किती प्रेमाने खायला घालता, याचा असतो. भारतीय क्रिकेटपटू जेव्हा पाकिस्तानमध्ये येतात तेव्हा त्यांना खूप प्रेम मिळतं, त्यामुळे भारतीयांनीही आमच्यावर प्रेम केलं पाहिजे,' असं वक्तव्य आफ्रिदीने केलं.

शाहिद आफ्रिदीने आपल्या करियरमध्ये 27 टेस्ट, 398 वनडे आणि 99 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या आहेत. आफ्रिदीच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये 5 शतकं आणि 8 अर्धशतकांच्या मदतीने 1,716 रन केले. वनडे क्रिकेटमध्ये आफ्रिदीने 6 शतकं आणि 39 अर्धशतकांसह 8,064 रन केले आणि टी-20 क्रिकेटमध्ये आफ्रिदीने 4 अर्धशतकं करून 1,416 रन केले. याचसोबत 113 प्रथम श्रेणी मॅचमध्ये आफ्रिदीच्या नावावर 5,695 रन आहेत.

First published:

Tags: Pakistan, Shahid Afridi, Shahrukh khan