VIDEO : आफ्रिदी की विराट? डेटवर जाण्यासाठी पाकिस्तानी तरूणींनी सांगितली पहिली पसंती

VIDEO : आफ्रिदी की विराट? डेटवर जाण्यासाठी पाकिस्तानी तरूणींनी सांगितली पहिली पसंती

विराट कोहली आणि शाहीद आफ्रिदी यांच्यात पाकिस्तान चाहत्यांमध्ये जुंपली.

  • Share this:

कराची, 26 सप्टेंबर : भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये नेहमीच क्रिकेटच्या पलीकडे संबंध आहेत. भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानसोबत क्रिकेट सामने हे नेहमीच वादाचा मुद्दा असतो. दरम्यान 2012नंतर भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये कोणतीही मालिका झालेली नाही. हे दोन्ही संघ फक्त आयसीसीच्या स्पर्धांमध्ये किंवा आशियाई कपमध्ये एकमेकांविरोधात खेळतात. यात भारतीय संघाचे पारडे नेहमीच जड राहिले आहे.

भारत-पाकिस्तान यांच्यात फक्त क्रिकेटमध्येच नाही तर चाहत्यांमध्येही द्वंद्वयुद्ध पाहायला मिळते. सोशल मीडियावर दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांमध्ये आपला देश कसा वरचढ आहे, याबाबतच चर्चा सुरू असतात. दरम्यान सध्या सोशल मीडियावर पाकिस्तानमधील क्रिकेट चाहत्यांचा एक व्हिडिओ व्हारयल झाला आहे. यात पाकिस्तानी क्रिकेट चाहते विराट कोहली की शाहिद आफ्रिदी कोणाला डेट करतील असा प्रश्न विचारण्यात आला. यावर प्रत्येक चाहतीनं वेगवेगळे उत्तर दिले.

या व्हिडिओमध्ये चाहत्यांना, जर तुम्हाला एक संधी मिळाली विराट आणि आफ्रिदी यांच्यापैकी एकाला डेट करण्याची तर तुम्ही कोणाची निवड कराल असा प्रश्न विचारण्यात आला. यावर काही चाहत्यांनी विराटचे नाव घेतले तर काहींनी, आपल्या घरच्या मुलाला पहिले प्राधान्य दिले पाहिजे असे म्हणजे आफ्रिदीचे नाव घेतले. तर, एका चाहतीनं लग्न झालेल्या पुरुषांवर नजर टाकणे चुकीचे आहे, असं म्हणत रिपोर्टरला फटकारले.

वाचा-लिलावाची तारीख ठरली, मात्र टी-20 वर्ल्ड कपमुळं वेळापत्रकात होणार बदल

तसेच, शाहिद आणि विराट यांच्यात सर्वात चांगला दिसायला कोण आहे, असे विचारले असते एका चाहतीनं दोघं ठीकठाक आहे, असे उत्तर दिले. दरम्यान या व्हिडिओमध्ये शाहिद आफ्रिदी आता म्हातारा झाला आहे, असा सवाल चाहतीला विचारला. त्यानंतर चाहतीनं भडकून तुम्ही 45चे होत नाही तोपर्यंत म्हातारे होत नाही, असे उत्तर दिले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये दिलेल्या उत्तरावरून ट्रोलही करण्यात येत आहे.

वाचा-भारताचा जेंटलमन आरोपीच्या पिंजऱ्यात! गंभीर आरोपांवर आज होणार फैसला

या व्हिडिओमध्ये एका चाहतीनं विराट हिंदू असल्यामुळं त्याला डेट करू शकत नाही, असे उत्तर दिले. यावर भारतीय चाहत्यांनी कोहलीशी संवाद साधण्यासाठी आधी इंग्रजी यायला हवे त्याचा अभ्यास करा, अशा शब्दात तिला फटकारले. तर, काही चाहत्यांनी विराट आणि आफ्रिदी यांची तुलना म्हणजे वाघाला बकरीसोबत तुलना करण्यासारखा आहे. दरम्यान, या व्हिडिओमध्ये जास्त चाहतींनी विराटची निवड केली आहे.

वाचा-Run Outवरून भरमैदानात तू-तू, मैं-मैं! क्रिकेट पीचवरचा मजेदार VIDEO पाहिलात का?

पुणे: पाण्यात अडकलेल्या चिमुकल्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO

First published: September 26, 2019, 1:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading