सरकारने रेशन नाकारलेल्या पाकमधील हिंदूंसाठी आफ्रिदी आला धावून, केलं अन्नदान

काही दिवसांपूर्वी, सरकारच्या वतीने देण्यात येणारे रेशन पाकमधील हिंदूना नाकारण्यात आले होते. अशाच हिंदूना मदत करण्यासाठी पाकचा अष्टपैलू खेळाडू आफ्रिदी पुढे आला आहे.

  • Share this:

इस्लामाबाद, 01 एप्रिल: जगभरात कोरोनाची भीती वाढत आहे. भारताप्रमाणे पाकिस्तानमध्येही कोरोना मोठ्या वेगाने शिरकाव करत आहे. मात्र पाककडे सोयीसुविधा नसल्यामुळं लोकांना मदत मिळत नाही आहे. यातच पाकमधील हिंदूना रेशनही दिले जात नाही आहे. काही दिवसांपूर्वी, सरकारच्या वतीने देण्यात येणारे रेशन पाकमधील हिंदूना नाकारण्यात आले होतं. अशाच हिंदूना मदत करण्यासाठी पाकचा अष्टपैलू खेळाडू आफ्रिदी पुढे सरसावला आहे.

शाहिदी आफ्रिदी आपल्या संस्थेच्या माध्यमातून गरीब आणि गरजू व्यक्तींसाठी मोफत अन्न आणि वैद्यकीय गोष्टींचं मोफत वाटप केलं आहे. यासाठी आफ्रिदीने सोशल मीडियावर 'डोनेट करो ना' हे अभियान राबवले होते. या अभियानाअंतर्गत आफ्रिदीने पाकिस्तानातील हिंदू आणि ख्रिश्चन वस्त्यांमधील गरजू व्यक्तींना अन्नदान केलं. आपल्या मदतकार्याचे फोटो आफ्रिदीने सोशल मीडियावर टाकले होते.

वाचा- पाकचे नापाक काम, कोरोनाच्या आपत्तीत हिंदूना नाकारले रेशन

वाचा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मानले हिटमॅनचे आभार, म्हणाले Thank You रोहित

हिंदूंना नाकारले होते रेशन

सिंध प्रांतात कोरोनाची भीती दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर येथील मुस्लिमांना रेशन व आवश्यक वस्तू दिल्या जात आहेत पण हिंदूंना मात्र देण्यास नकार दिला जात आहे. हिंदूंना सांगण्यात आले आहे की, हे रेशन फक्त मुस्लिमांसाठी आहे. यामुळे येथील हिंदूंमध्ये संतापाचे वातावरण आहे. पाकमधील लॉकडाऊन लक्षात घेता दररोज कामगार आणि कामगारांना स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि प्रशासनाच्या वतीने रेशन देण्याचे आदेश सिंध सरकारने दिले आहेत. मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार प्रशासनाने हिंदूंना तुम्ही रेशन मिळण्यास पात्र नाही, असे सांगण्यात आले.

वाचा-Real Champion! कोरोनाशी लढण्यासाठी 15 वर्षाच्या शूटरने केली 30000 ची मदत

हरभजन आणि युवीने केले आफ्रिदीचे कौतुक

आफ्रिदीने गरजूंना केलेल्या अन्नदानानंतर भारताचे माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह आणि युवराज सिंह यांनीही त्याचे कौतुक केलं आहे. सध्याच्या परिस्थितीत आफ्रिदीने केलेले काम कौतुकास्पद असल्याचे मत या दोघांनी व्यक्त केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2020 03:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading