हिंदूच्या मदतीसाठी धावून आला 'हा' पाक क्रिकेटपटू, मंदिरात जाऊन वाटलं रेशन

हिंदूच्या मदतीसाठी धावून आला 'हा' पाक क्रिकेटपटू, मंदिरात जाऊन वाटलं रेशन

पाकिस्तानमध्ये कोरोनाबरोबर लोकांना उपासमारीलाही सामोरं जावं लागत आहे. यात अल्पसंख्याक हिंदूची जास्त वाईट अवस्था आहे. दरम्यान पाकमधील हिंदूच्या मदतीसाठी चक्क पाकिस्तानचा एक क्रिकेटपटू पुढे आला आहे.

  • Share this:

इस्लामाबाद, 14 मे : कोरोनानं साऱ्या जगात थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. तब्बल 190 देशांमध्ये कोरोनाचे संक्रमण झाले आहे. पाकिस्तानमध्येही कोरोनामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. कोरोनाबरोबर लोकांना उपासमारीलाही सामोरं जावं लागत आहे. यात अल्पसंख्याक हिंदूची जास्त वाईट अवस्था आहे. दरम्यान पाकमधील हिंदूच्या मदतीसाठी चक्क पाकिस्तानचा एक क्रिकेटपटू पुढे आला आहे. त्यानं पाकमधील मंदिरात जाऊन लोकांना सामना दिले .

पाकचा स्टार खेळाडू आणि माजी कर्णधार शाहिद आफ्रिदींन आपली संस्था होप नॉट आउटच्या माध्यमातून गरजूंना मदत करत असतो. आफ्रिदीनं पाकिस्तानमधील एक मंदिरात जाऊन हिंदूंना सामना दिले, याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचबरोबर जगभरातील क्रिकेटपटूंनी आफ्रिदीचं कौतुक केलं आहे. आफ्रिदीनं काही फोटो पोस्ट करत, "आपण सगळे यात एकत्र आहोत, एकत्रच याच्याशी दोनहात करू. एकता हीच आपली ताकद आहे. लक्ष्मी नारायण मंदिरात आम्ही गरजेच्या सामानाचं वितरण केलं.

'डोनेट करो ना' अभियान

शाहिदी आफ्रिदी आपल्या संस्थेच्या माध्यमातून गरीब आणि गरजू व्यक्तींसाठी मोफत अन्न आणि वैद्यकीय गोष्टींचं मोफत वाटप केलं आहे. यासाठी आफ्रिदीने सोशल मीडियावर 'डोनेट करो ना' हे अभियान राबवले होते. या अभियानाअंतर्गत आफ्रिदीने पाकिस्तानातील हिंदू आणि ख्रिश्चन वस्त्यांमधील गरजू व्यक्तींना अन्नदान केलं. आपल्या मदतकार्याचे फोटो आफ्रिदीने सोशल मीडियावर टाकलं होते. आफ्रिदीने गरजूंना केलेल्या अन्नदानानंतर भारताचे माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह आणि युवराज सिंह यांनीही त्याचे कौतुक केलं आहे. सध्याच्या परिस्थितीत आफ्रिदीने केलेले काम कौतुकास्पद असल्याचे मत या दोघांनी व्यक्त केले होते.

First published: May 14, 2020, 8:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading