मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

शाहिद आफ्रिदीची मुलगी करणार या क्रिकेटपटूशी लग्न

शाहिद आफ्रिदीची मुलगी करणार या क्रिकेटपटूशी लग्न

पाकिस्तानचा माजी ऑलराऊंडर शाहिद आफ्रिदीच्या (Shahid Afridi) मुलीचं लवकरच लग्न होणार आहे. पाकिस्तानचा फास्ट बॉलर शाहिन आफ्रिदीसोबत (Shaheen Afridi) शाहिद आफ्रिदीची मुलगी लग्न करणार असल्याचं वृत्त आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 7 मार्च : पाकिस्तानचा माजी ऑलराऊंडर शाहिद आफ्रिदीच्या (Shahid Afridi) मुलीचं लवकरच लग्न होणार आहे. पाकिस्तानचा फास्ट बॉलर शाहिन आफ्रिदीसोबत (Shaheen Afridi) शाहिद आफ्रिदीची मुलगी लग्न करणार असल्याचं वृत्त आहे. शाहिन आणि शाहिद आफ्रिदीची मुलगी अक्सा यांचा लवकरच साखरपुडा होणार आहे. शाहिनचे वडील अय्याझ खान यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

शाहिनचे वडील अय्याझ खान पाकिस्तानी मीडियाशी बोलताना म्हणाले, 'माझ्या मुलाचा साखरपुडा अक्सा आफ्रिदीशी होणार आहे. अक्सा जेव्हा शिक्षण पूर्ण करेल, तेव्हा दोघं लग्न करतील.' तर दुसरीकडे पाकिस्तानी पत्रकार एहतिशाम उल हक यांनीही ट्विट करून या दोघांचं लग्न होणार असल्याचं सांगितलं.

'दोनी कुटुंबाला हे नात मंजूर आहे आणि लवकरच शाहिद आफ्रिदीची मुलगी अक्सा आणि फास्ट बॉलर शाहिन आफ्रिदी यांचा साखरपुडा होईल. साखरपुड्याच्या दोन वर्षात हे दोघं लग्न करतील. अक्साचं शिक्षण संपल्यानंतर लगेचच हा सोहळा पार पडेल,' असं एहतिशाम उल हक म्हणाले.

शाहिद आफ्रिदी आणि शाहिन शाह आफ्रिदी दोघंही पाकिस्तान सुपर लीग 2021 मध्ये खेळताना दिसले. पण कोरोना व्हायरसमुळे ही स्पर्धा 14 मॅचनंतर रद्द करण्यात आली. शाहिन शाह आफ्रिदीने या स्पर्धेत 4 मॅचमध्ये 9 विकेट घेतल्या होत्या. दुसरीकडे मुल्तान सुल्तानकडून खेळताना शाहिद आफ्रिदीनेही 5 विकेट घेतल्या होत्या.

First published:

Tags: Cricket, Pakistan, Shahid Afridi