मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /PAK vs SA: शाहिद आफ्रिदीची IPL वर टीका, दक्षिण आफ्रिका बोर्डालाही लगावला टोला

PAK vs SA: शाहिद आफ्रिदीची IPL वर टीका, दक्षिण आफ्रिका बोर्डालाही लगावला टोला

जगभरातील क्रिकेटपटू आयपीएल स्पर्धेसाठी (IPL 2021) भारतात दाखल झाले आहेत. पाकिस्तानच्या खेळाडूंना मात्र ती संधी नाही. त्यामुळे शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) आयपीएलवर नाराज आहे.

जगभरातील क्रिकेटपटू आयपीएल स्पर्धेसाठी (IPL 2021) भारतात दाखल झाले आहेत. पाकिस्तानच्या खेळाडूंना मात्र ती संधी नाही. त्यामुळे शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) आयपीएलवर नाराज आहे.

जगभरातील क्रिकेटपटू आयपीएल स्पर्धेसाठी (IPL 2021) भारतात दाखल झाले आहेत. पाकिस्तानच्या खेळाडूंना मात्र ती संधी नाही. त्यामुळे शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) आयपीएलवर नाराज आहे.

लाहोर, 8 एप्रिल: पाकिस्तानचा क्रिकेटपटू  शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) याची अवस्था 'नाचता येईना अंगण वाकडे' अशी झाली आहे. जगभरातील क्रिकेटपटू आयपीएल स्पर्धेसाठी (IPL 2021) भारतात दाखल झाले आहेत. पाकिस्तानच्या खेळाडूंना मात्र ती संधी नाही. त्यामुळे आफ्रिदी आयपीएलवर नाराज आहे. पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (Pakistan vs South Africa) यांच्यात झालेली वन-डे मालिका 2-1 अशा फरकानं जिंकली. त्यानंतर आफ्रिदीनं ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे.

पाकिस्तान विरुद्धची वन-डे मालिका सुरु असतानाच दक्षिण आफ्रिकेचे बडे खेळाडू आयपीएल खेळण्यासाठी भारतामध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे या मुद्यावर आफ्रिदीनं नाराजी व्यक्त केली आहे. "दक्षिण आफ्रिकेच्या बोर्डानं त्यांना मालिका सुरु असतानाच IPL खेळण्यासाठी जाण्याची परवानगी दिली, हे आश्चर्यकारक आहे.  T20 लीग इंटरनॅशनल क्रिकेटवर वरचढ ठरताना पाहून वाईट वाटते. या विषयावर विचार करण्याची गरज आहे." असं मत आफ्रदीनं व्यक्त केलं आहे.

पाकिस्ताननं मालिका जिंकली

पाकिस्ताननं तिसऱ्या वन-डे मध्ये पहिल्यांदा बॅटींग करताना 50 ओव्हरमध्ये 7 आऊट 320 रन काढले. दुसऱ्या वन-डे मझ्ये 193 रनची खेळी करणाऱ्या फखर जमान (Fakhar Zaman) याने तिसऱ्या वन-डेमध्ये देखील शतक झळकावलं. फखरनं 101 रन काढले.

पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमने (Babar Azam) 94 रन काढत फखरला चांगली साथ दिली. याशिवाय इमाम-उल-हकने 54 आणि हसन अलीनं फक्त 11 बॉलमध्ये 32 रन काढले. या सर्वांच्या योगदानामुळे पाकिस्तानने आफ्रिकेसमोर 321 रनचं टार्गेट ठेवलं.

( वाचा:  वानखेडे स्टेडियमरील सामने इतरत्र हलवा, Corona संकटकाळात मुंबईकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र )

दक्षिण आफ्रिकेला हे आव्हान पेलवलं नाही. त्यांची संपूर्ण टीम 49.3 ओव्हरमध्ये 294 रनवर ऑल आऊट झाली. या मालिकेतील पहिली वन-डे पाकिस्ताननं जिंकली होती. तर त्यानंतरची दुसरी वन-डे दक्षिण आफ्रिकेनं जिंकून मालिकेत बरोबरी साधली. तिसरी आणि शेवटची वन-डे जिंकत पाकिस्ताननं ही मालिका जिंकली आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket, International, IPL 2021, Pakistan, Shahid Afridi, South africa, Sports