कराची, 20 सप्टेंबर : पाकिस्तानमध्ये जवळ जवळ 10 वर्ष घरच्या मैदानावर एकही सामना खेळला गेलेला नाही. 2009मध्ये पाकिस्तानमध्ये श्रीलंका संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कोणतेही सामने खेळले गेले नाहीत. दरम्यान तब्बल 10 वर्षांनी पुन्हा श्रीलंकेचाच संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यासाठी इच्छूक आहे. मात्र श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डानं खेळाडू तयार नसल्याचे कारण देत, हा दौरा पुढे ढकलला. यामुळं पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहीद आफ्रिदी भडकला आहे.
सध्या श्रीलंकेचा पाकिस्तान दौरा सगळ्यात चर्चेचा विषय आहे. श्रीलंकेच्या टॉप खेळाडूंनी पाकिस्तानात जाण्यास नकार दिला आहे. त्यानंतर नव्या संघाची निवड करण्यात आली. अखेर गुरुवारी श्रीलंका बोर्डानं नव्या संघाची घोषणा केली. त्यानंतर आफ्रिदीनं भारतावर आरोप केले आहेत. आफ्रिदीच्या मते, श्रीलंकेतील खेळाडू आयपीएलमध्ये खेळत असल्यामुळं त्यांना पाकिस्तानात खेळण्याची भीती वाटत असल्याचे मत व्यक्त केले.
आफ्रिदीनं नुकत्याच एका मुलाखतीत, भारतात खेळल्या जाणाऱ्या इंडियन प्रिमीअर लीगमुळे श्रीलंकेतील खेळाडू पाकिस्तानमध्ये खेळण्याल तयार नाही आहेत. आफ्रिदीनं भारतावर आरोप करत, “श्रीलंकेच्या खेळाडूंवर आयपीएलमधील मालकांचा दबाव आहे. मी मागच्यावेळी अनेक श्रीलंकेच्या खेळाडूंशी बातचित केली. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की खेळाडूंना पाकिस्तानमध्ये यायचे आहे. मात्र पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळल्यास आयपीएलचा करार संपू शकतो, ही भिती या खेळाडूंना आहे”, असे सांगितले.
Shahid Afridi Srilankan Players who are not Going to Pakistan reason is IPL & IPL Franchise : @SAfridiOfficial pic.twitter.com/vc7ob32g3E
Loading...— Just a Fan (@iemRahul_) September 20, 2019
वाचा-विराटसमोर आफ्रिदी झाला 'नतमस्तक', सोशल मीडियावरून केलं कौतुक
श्रीलंकेचा संघ या महिन्यांच्या अंती पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेत तीन एकदिवसीय, तीन टी-20 सामने खेळले जाणार आहेत. गुरुवारी श्रीलंका क्रिकेट बोर्डानं, “सुरक्षा मंत्रालयाच्या वतीनं आम्हाला पाकिस्तानात जाण्याची संधी दिली. त्यामुळं आम्ही पाकिस्तानमध्ये 27 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर दरम्यान जाणार आहोत”, असे सांगितले.
या खेळाडूंनी घेतली माघार
2009 साली पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या श्रीलंकेच्या टीमवर जीवघेणा दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. दहशतवाद्यांनी श्रीलंका टीमच्या बसवर गोळीबार केला होता. यात 6 खेळाडू जखमी झाले होते. त्यामुळं श्रीलंकेच्या 10 प्रमुख खेळाडूंनी या दौऱ्यातून सुरक्षेच्या कारणामुळे माघार घेतली आहे. दिमुथ करुणारत्ने, लसिथ मलिंगा, एंजलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, कुसल परेरा, धनंजय डिसिल्वा, थिसारा परेरा, अकिला धनंजया, सुरंगा लकमल, दिनेश चंडीमल यांनी पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला आहे.
वाचा-शुद्ध घी विरुद्ध डालडा! द्रविडसोबतच्या फोटोमुळं शास्त्री पुन्हा झाले ट्रोल
श्रीलंकेची वनडे संघ
लाहिरु थिरमान(कर्णधार), दानुष्का गुणतिलका, सदीरा समरविक्रमा, आविष्का फर्नांडो, ओशादा फर्नांडो, शेहान जयसूर्या, मिनोद बनुका, एंजलो परेरा, वानिंदु हसरंगा, लक्षण संदाकन, नुवान प्रदीप, इसरु उडाना, कसुन रजीता, लाहिरु कुमारा.
श्रीलंकेची टी-20 संघ
दासुन शनाका (कर्णधार), दानुष्का गुणतिलका, सदीरा समरविक्रमा, आविष्का फर्नांडो, ओशादा फर्नांडो, शेहान जयसूर्या, एंजलो परेरा, भानुका राजपक्षे, मिनोद बनुका, लाहिरु मदुशंका, वानिंदु हसरंगा, लक्षण संदाकन, नुवान प्रदीप, इसरु उडाना, कसुन रजीता, लाहिरु कुमारा.
वाचा-IPL: मुंबई इंडियन्सची बल्ले बल्ले; विराटच्या संघाला मोठा झटका!
पत्ताच्या बंगल्याप्रमाणे कोसळली मुंबईत इमारत LIVE VIDEO
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा