मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

शाहिद आफ्रिदीने पुन्हा मर्यादा ओलांडली, 'काश्मीर'मध्ये परत नाक खुपसलं

शाहिद आफ्रिदीने पुन्हा मर्यादा ओलांडली, 'काश्मीर'मध्ये परत नाक खुपसलं

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) याने पुन्हा एकदा काश्मीर (Kashmir) बाबत बोलताना मर्यादा ओलांडली आहे.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) याने पुन्हा एकदा काश्मीर (Kashmir) बाबत बोलताना मर्यादा ओलांडली आहे.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) याने पुन्हा एकदा काश्मीर (Kashmir) बाबत बोलताना मर्यादा ओलांडली आहे.

    मुंबई, 30 डिसेंबर : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) याने पुन्हा एकदा काश्मीर (Kashmir) बाबत बोलताना मर्यादा ओलांडली आहे. पाकव्याप्त काश्मीर (Pakistan Occupied Kashmir) मध्ये आफ्रिदीला क्रिकेट अकादमी सुरू करायची आहे. स्थानिक लोकांना खेळामध्ये आणण्यासाठी आपण इच्छूक असल्याचं आफ्रिदी म्हणाला आहे. एवढच नाही तर आफ्रिदी काश्मीर प्रीमियर लीग (Kashmir Premiere League) मध्ये खेळण्यासाठीही उत्सुक आहे. मी केपीएलसाठी जेवढं चांगलं करायचा प्रयत्न करता येईल तेवढं करीन. काश्मीरमध्ये क्रिकेट अकादमी स्थापन करायला मिळाली, तर मी केपीएलमध्ये खेळीन, अशी अट ठेवली असल्याचं आफ्रिदी म्हणाला. 'मी सगळ्यांनाच केपीएलचं समर्थन करण्याचा आग्रह करतो. खेळाशिवाय आरोग्य क्षेत्रासाठीही काश्मीरमध्ये काम करीन. जर मॅच काश्मीरमध्ये झाल्या, तर त्यामुळे फायदा होईल. लीगचं ब्रॅण्ड ऍम्बेसेडर होणं सन्मानाची गोष्ट आहे. काश्मिरी मुलांना मी क्रिकेटमध्ये आणीन. माझी फाऊंडेशन चांगल्या प्रतिभावान खेळाडूंचं समर्थन करेल,' अशी प्रतिक्रिया आफ्रिदीने दिली. भारतावर आरोप या भाषणबाजीमध्ये शाहिद आफ्रिदीने भारतावर आरोप केले. 'भारताने काश्मीरमध्ये अत्याचाराच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. जर जगात कुठेही अन्याय होत असेल, तर आपल्याला आवाज उठवावा लागेल. एक वेळ येईल जेव्हा काश्मीर मुक्त होईल. काश्मिरींसाठी वारंवार आवाज उठवणं शासकांची जबाबदारी आहे,' असं आफ्रिदी म्हणाला. काश्मीर प्रीमियर लीगचे अध्यक्ष आरिफ मलिक यांनीही या लीगबाबत माहिती दिली आहे. 'हजारो युवा खेळाडू ट्रायल्समध्ये सहभागी होतील. केपीएलच्या माध्यमांमधून युवा खेळाडूंना स्थानिक टीम आणि मग पाकिस्तान सुपर लीगमध्ये संधी मिळेल. केपीएलदरम्यान निधीही उभारला जाईल. केपीएलचं उद्दीष्ट क्रिकेटसोबतच सामाजिक विकास करणंही आहे, ज्यामुळे काश्मीरच्या लोकांना संधी मिळेल,' असं मलिक म्हणाले. शाहिद आफ्रिदी याची केपीएलच्या ब्रॅण्ड ऍम्बेसेडरपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या