Home /News /sport /

'तो माझे ऐकतचं नाही' बॉलर शाहीनवर नाराज आहेत सासरेबुवा, काय आहे कारण?

'तो माझे ऐकतचं नाही' बॉलर शाहीनवर नाराज आहेत सासरेबुवा, काय आहे कारण?

Shaheen Shah Afridi

Shaheen Shah Afridi

2018 सालापासून पाकिस्तान सुपर लीगमध्ये (Pakistan Super League) अप्रतिम गोलंदाजी करणाऱ्या शाहीन आफ्रिदीकडे (Shaheen Shah Afridi) आता कर्णधारपदाची अतिरिक्त जबाबदारी आली आहे.

    नवी दिल्ली, 23 डिसेंबर: उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर प्रसिद्धी मिळवणाऱ्या शाहीन शाह आफ्रिदीला(Shaheen Shah Afridi) पाकिस्तान सुपर लीग 2022 च्या आधी मोठी बातमी मिळाली आहे. शाहीन आफ्रिदीला लाहोर कलंदरचा कर्णधार बनवण्यात आला आहे. शाहीनच्या पीएसएल संघाचा कर्णधार झाल्याबद्दल सासरा शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) मोठी प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानी मीडियाशी बोलताना आफ्रिदीने शाहीनच्या लाहोर कलंदर संघाच्या कर्णधारपदी नियुक्तीबद्दल आपले मत मांडले आणि म्हणाला, 'मी शाहीनला कर्णधारपद स्वीकारण्यापूर्वी एक-दोन वर्षे वाट पाहण्याचा सल्ला दिला होता, जेणेकरून तो कर्णधारपद स्वीकारू शकेल. पण तो आफ्रिदी असल्याने त्याने माझे ऐकले नाही. माजी पाकिस्तानी कर्णधार पुढे म्हणाला की, 'मला आनंद आहे की त्याने ही जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे आणि मला आशा आहे की तो मला चुकीचे सिद्ध करेल.' दुसरीकडे, शाहीनला कलंदर्स संघाचा कर्णधार बनवल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आणि ट्विट करून आनंद व्यक्त केला. ' एक मोठी जबाबदारी आहे. आम्ही एक संघ म्हणून एकत्र खेळू आणि हृदय आणि ट्रॉफी दोन्ही जिंकू. तसेच, लाहोर कलंदरचा कर्णधार म्हणून हा मोठा सन्मान असल्याचेही शाहीनने ट्विटमध्ये म्हटले आहे. 2018 सालापासून पाकिस्तान सुपर लीगमध्ये (Pakistan Super League) अप्रतिम गोलंदाजी करणाऱ्या शाहीन आफ्रिदीकडे (Shaheen Shah Afridi) आता कर्णधारपदाची अतिरिक्त जबाबदारी आली आहे. शाहीन आफ्रिदीला कर्णधार बनवल्याने या खेळाडूचा खेळ आणखी वाढेल, असा विश्वास लाहोर कलंदरचे प्रशिक्षक आकिब जावेद यांनी व्यक्त केला.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Shahid Afridi

    पुढील बातम्या