टीक टॉक स्टारनं लीक केला क्रिकेटपटूचा न्यूड व्हिडीओ, सोशल मीडियावर खळबळ

टीक टॉक स्टारनं लीक केला क्रिकेटपटूचा न्यूड व्हिडीओ, सोशल मीडियावर खळबळ

सोशल मीडियावर लीक झाला स्टार क्रिकेटपटूचा न्यूड व्हिडीओ.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 नोव्हेंबर : क्रिकेट हा जेंटलमन गेम म्हणून ओळखला जातो. मात्र सध्या क्रिकेटमध्ये अनैतिक संबंधांपासून ते मॅच फिक्सिंगपर्यंतचे सर्व प्रकार घडत आहेत. यातच आता चक्क एका क्रिकेटपटूचा न्यूड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळं सध्या क्रिकेट जगतात खळबळ माजली आहे.

पाकिस्तानचा स्टार युवा खेळाडू शाहीन आफ्रिदी याचा न्यूड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, पाकमध्ये एकाच दिवशी दोन सेलिब्रिटींचे व्हिडीओ व्हायरल होण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शाहीनच्या आधी पाकची गायक रबी पीरजादा हिची व्हिडीओ व्हायरल झाला होता. असे म्हटले जात आहे की शाहीनचा व्हिडीओ टिक टॉक स्टार हरीम शाहनं लीक केला आहे. या अफवांनंतर हरिमनं ज्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ टाकण्यात आला आहे, तो माझा नसल्याचे मत व्यक्त केले आहे.

वाचा-दिल्लीतील टी-20वर टांगती तलवार कायम, सामना होणार की नाही 'ही' आहे डेडलाईन

पाकचा युवा खेळाडू शाहीन आफ्रिदी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याआधी मुलींची छेड काढल्याचा आरोप करण्यात आला. त्यासंबंधी त्याचे व्हॉट्सअप चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता पुन्हा एकदा या न्यूड व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये शाहीन हस्तनामैथून करताना दिसत असल्याचा आरोप हरीम शाहनं केला आहे.

वाचा-प्रदूषणाच्या वादात अडकलेल्या दिल्ली टी-20त घडणार इतिहास!

टिक टॉक स्टार हरीम शाहवर व्हिडीओ लीक केल्याचा आरोप केल्यानंतर हे अकाउंट माझे नसल्याचा खुलासा हरीमनं केला आहे. हरीमनं एका व्हिडीओमध्ये, “माझ्या नावानं कोणी दुसरी व्यक्ती ट्विटर वापरत आहे. माझा आणि त्या व्यक्तिचा काही एक संबंध नाही”, असे मत व्यक्त केले.

वाचा-हिटमॅन आणि धवन 19 वर्षीय गोलंदाजासमोर फेल, काही चेंडूत झाले आऊट!

दरम्यान ज्या अकाउंटवरून हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, तेथून हा व्हिडीओ डिलीट करण्यात आला आहे. काही लोकांनी शाहीन आफ्रिदीचे क्रिकेट करिअर संपवण्याचा हा डाव असल्याचे मत व्यक्त केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: nude shoot
First Published: Nov 3, 2019 05:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading