Home /News /sport /

विराट, रोहित आणि राहुल...टीम इंडियाची वाट लावणारा खेळाडू झाला पोलीस, DSP पदावर नियुक्ती

विराट, रोहित आणि राहुल...टीम इंडियाची वाट लावणारा खेळाडू झाला पोलीस, DSP पदावर नियुक्ती

रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि केएल राहुल (KL Rahul) टीम इंडियाच्या (Team India) या दिग्गजांची विकेट घेणं हे प्रत्येक बॉलरचं स्वप्न असतं. हे स्वप्न ऑक्टोबर 2021 साली सत्यात उतरलं.

    कराची, 5 जुलै : रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि केएल राहुल (KL Rahul) टीम इंडियाच्या (Team India) या दिग्गजांची विकेट घेणं हे प्रत्येक बॉलरचं स्वप्न असतं. हे स्वप्न ऑक्टोबर 2021 साली सत्यात उतरलं. पाकिस्तानचा फास्ट बॉलर शाहिन आफ्रिदीने (Shaheen Afridi) टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) भारताच्या या बिनीच्या शिलेदारांना माघारी पाठवलं. आफ्रिदीच्या या भेदक बॉलिंगमुळे पाकिस्तानला पहिल्यांदाच वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध विजय मिळवता आला. हाच शाहिन आफ्रिदी आता पोलीस झाला आहे. खैबर पख्तुनख्वा पोलिसांनी त्याला मानद डीएसपी पद दिलं आहे, याशिवाय त्याला गुडविल ऍम्बेसेडरही करण्यात आलं आहे. शाहिन आफ्रिदीचे वडील पोलीस अधिकारी होता, पण आता ते निवृत्त झाला आहे. तसंच त्याचा भाऊदेखील पोलीस आहे. शाहिन आफ्रिदी पाकिस्तानच्या तरुणांमध्ये लोकप्रिय आहे, त्यामुळे त्याला मानद डीएसपी पद देण्यात आलं आहे. मानद डीएसपी पद स्वीकारतानाचा शाहिन आफ्रिदीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांचा ऍम्बेसेडर होणं अभिमानाची गोष्ट असल्याचं शाहिन आफ्रिदी म्हणाला आहे. पाकिस्तानचा श्रीलंका दौरा पाकिस्तानची टीम या महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे, या दौऱ्यात 2 टेस्ट मॅच होणार आहेत. श्रीलंका दौऱ्यात शाहिन आफ्रिदी पाकिस्तानी टीमचा भाग असेल. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. या वर्ल्ड कपमध्येही भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात पुन्हा एकदा शाहिन आफ्रिदी टीम इंडियाविरुद्ध खेळताना दिसेल.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India vs Pakistan, T20 world cup, Team india

    पुढील बातम्या