शाहबाजने मोडला वर्ल्ड रेकॉर्ड, फक्त १० रन देऊन घेतल्या 8 विकेट

शाहबाजने मोडला वर्ल्ड रेकॉर्ड, फक्त १० रन देऊन घेतल्या 8 विकेट

झारखंडचा लेफ्ट आर्म स्पिनर शाहबाज नदीमने राजस्थानविरोधात फक्त १० धावा देऊन ८ बळी घेत आपल्या नावावर नव्या विक्रमाची नोंद केली.

  • Share this:

दुबई, ता. 20 सप्टेंबर : झारखंडचा लेफ्ट आर्म स्पिनर शाहबाज नदीमने गुरूवारी विजय हजारे ट्रॉफीमध्ये बॉलिंगचा सर्वात मोठा विक्रम मोडलाय. नदीमने राजस्थानविरोधात फक्त १० धावा देऊन ८ बळी घेतलेत. नदीमच्या या कामगिरीमुळे लिस्ट ए मध्ये त्याने दिल्लीच्या राहुल संघवीचा विक्रम मोडलाय. त्याचबरोबर नदीम सर्वात कमी धावा देऊन जास्त बळी घेणारा खेळाडू ठरलाय.

चेन्नइमध्ये सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये आज झारखंड विरुद्धच्या पहिल्या डावात राजस्थानचा संघ ७३ धावांतच सर्वबाद झाला. त्यानंतर झारखंडने १४.३ ओवरमध्ये अवघे तीन खेळाडू गमावून सामना आपल्या खिशात घातला. या सामन्यात नदीमने १० ओवर टाकल्या. त्यामध्ये ४ मेडन ओवरचा समावेश असून त्याने १० धावा आणि ८ बळी घेतलेत. तसेच संघवीने १९९७-९८ मध्ये हिमाचल प्रदेशच्याविरूद्ध १५ धावा देऊन ८ बळी घेतले होते.

त्याचबरोबर मर्यादित ओवरच्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या किथ बोयस याच्या नावावर ८ बळी घेण्याचा विक्रम आहे. १९७१ मध्ये किथने २६ धावा देऊन ८ बळी घेतले होते. त्यांतर दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडच्या डेरेक अंडरवूडचा समावेश आहे. त्याने १९८७ मध्ये ३१ धावा देऊन ८ बळी घेतले होते.

त्यानंतर लगेच एका वर्षातच वेस्ट इंडिजच्या मायकल होल्डींगने २१ धावा देऊन ८ बळी घेतले आणि किथचा विक्रम मोडला. संघवीने २० वर्षांनंतर होल्डींगचा विक्रम मोडला आणि आता नदीमने त्याच्याहून कमी धावा देऊन जास्त बळी घेऊन नव्या विक्रमाची आपल्या नावावर नोंद केली.

 

 

First published: September 20, 2018, 5:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading