15 व्या वर्षी टीम इंडियात निवड, 5 वर्षांपूर्वी घेतला होता क्रिकेट खेळण्याचा निर्णय

15 व्या वर्षी टीम इंडियात निवड, 5 वर्षांपूर्वी घेतला होता क्रिकेट खेळण्याचा निर्णय

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी महिलांच्या भारतीय संघाची निवड करण्यात आली असून 5 वर्षांपूर्वी सचिनचा अखेरचा सामना पाहून क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेणाऱ्या शेफालीला संधी मिळाली आहे.

  • Share this:

मुंबई, 06 सप्टेंबर : भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हणतात. त्यालाच आदर्श मानून 5 वर्षांपूर्वी एका दहा वर्षाच्या मुलीनं क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. सचिन त्याचा शेवटचा रणजी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. तेव्हा त्याला खेळताना पाहून त्या मुलीनं क्रिकेटमध्येच करिअर करायचा निर्णय़ घेतला. आता तिची निवड दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 संघात झाली आहे. 15 वर्षांची असलेली हरियाणाची शेफाली गेल्या वर्षी नागालँडविरुद्ध केलेल्या तुफान फटकेबाजीमुळं चर्चेत आली होती.

शेफालीनं पीटीआयशी बोलताना सांगितलं की, जितके लोक सचिनला पाहण्यासाठी आता होते तितकेच बाहेर होते. तेव्हा मला जाणवलं की भारताता क्रिकेटपटू होणं किती मोठी गोष्ट आहे. विशेष म्हणजे तेव्हा जेव्हा तुम्हाला सचिनसाऱखं क्रिकेटचा देव मानलं जातं. मी तो दिवस कधीच विसरू शकत नाही. माझ्या क्रिकेटला सुरुवात तेव्हापासूनच झाली.

भारतीय संघात निवडण्यात आलेल्या सर्वात युवा खेळाडूंमध्ये तिचा समावेश झाला आहे. रोहतकमध्ये जन्मलेल्या शेफालीचा आतापर्यंतचा प्रवास जबरदस्त आहे. तिनं पाच वर्षांपूर्वी खेळायला सुरुवात खेली. पहिल्या तीन हंगामात ती हरियाणाकडून खेळली आहे. भारतीय संघात आवडत्या खेळाडूबद्दल विचारताच तिनं कर्णधार मिताली राज आणि हरमनप्रीत कौर यांचे नाव घेतले.

शेफाली सर्वात पहिल्यांदा 2018-19 मध्ये आंतरराज्य महिला टी20 स्पर्धेवेळी चर्चेत आली होती. यामध्ये तिनं नागालँडविरुद्ध 56 चेंडूत 128 धावांची खेळी केली होती. त्यानंतर आयपीएलदरम्यान महिला टी20 चॅलेंजमध्ये तिनं आंतरराष्ट्रीय खेळाडूंविरुद्ध 31 चेंडूत 34 धावांची खेळी केली होती.

संघात निवड झाल्यानंतर शेफाली म्हणाली की, ती संघात निवड होण्याची वाट बघत होती. मी घरेलू क्रिकेट आणि जयपूरमधील स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. नुकतंच एनसीएचं शिबीर झालं. त्यातही चांगली कामगिरी केली होती.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी एकदिवसीय संघाचे कर्णधारपद मिताली राजकडे तर टी20 संघाचं नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे सोपवलं आहे. एकदिवसीय संघात जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर, पूनम राउत, स्मृती मानधना, दीप्ति शर्मा, तानिया भाटिया, झूलन गोस्वामी, शिखा पांडे, मानसी जोशी, एकता बिश्त, डी हेमलता, राजेश्वरी गायकवाड आणि प्रिया पूनिया यांचा समावेश आहे.

भारताची कर्णधार मिताली राजनं टी20 मधून निवृत्ती घेतली आहे. या संघाची जबाबदारी हरमनप्रीत कौरच्या खांद्यावर असणार आहे. पहिल्या तीन टी 20 सामन्यासाठी स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, तानिया भाटिया, पूनम यादव, शिखा पांडे, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्रकर, राधा यादव, वेदा कृष्णमूर्ती, हरलीन देओल, अनुजा पाटील, शेफाली वर्मा, मानसी जोशी यांची निवड करण्यात आली आहे.

VIDEO: तरुणाच्या डोक्यात घातला लोखंडी रॉड, बाप्पाची वर्गणी दिली नाही म्हणून काढला राग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Sep 6, 2019 11:15 AM IST

ताज्या बातम्या