नवी दिल्ली, 21 डिसेंबर: पाकिस्तानचा ऑलराउंडर शादाब खानने(shadab khan) अशा दोन बॅट्समनची नावे उघड केली आहेत. ज्यांच्यासमोर बॉलिंग करणे आव्हानात्मक असते. ट्विटरवर चाहत्यांशी संवाद साधताना शादाबने आपल्याला कोणत्या क्रिकेटर्सची भिती वाटते. याचा खुलासा केला आहे.
ट्विटरवर प्रश्नोत्तराच्या सत्रात 149 आंतरराष्ट्रीय विकेट घेणाऱ्या पाकिस्तानी ऑलराउंडर खेळाडूला एका चाहत्याने विचारले की बॉलिंग करण्यासाठी सर्वात अवघड बॅट्समन कोण आहे? या प्रश्नाच्या उत्तरात पाकिस्तानी खेळाडूने विराट कोहलीचे(Virat Kohli) नव्हे तर रोहित शर्माचे (Rohit Sharma) नाव घेतले.
2017 में इंटरनेशनल क्रिकेट में डेब्यू करने वाले शादाब ने रोहित शर्मा के अलावा डेविड वॉर्नर (David Warner) का भी नाम लिया. उनके अनुसार भारतीय सलामी बल्लेबाज रोहित शर्मा और ऑस्ट्रेलियाई सलामी बल्लेबाज डेविड वॉर्नर गेंदबाजों के लिए मुश्किल बल्लेबाज हैं.
2017 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या शादाबने रोहितसोबत डेव्हिड वॉर्नरचेदेखील नाव घेतले. तोदेखील बॉलर्ससाठी आव्हानात्मक बॅट्समन असल्याचे म्हटले आहे.
त्याचवेळी एका यूजरने त्याला गंमतीत विचारले की, तुमच्या टूथपेस्टमध्ये मीठ आहे का? या प्रश्नावर शादाबनेही मजेशीर उत्तर देत सांगितले की, मला माहीत नाही, मी पाहिले नाही. त्याचवेळी, त्याने सांगितले की चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 चा अंतिम सामना हा त्याचा आवडता सामना होता.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 च्या विजेतेपदाचा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला, ज्यामध्ये पाकिस्तानने 180 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 4 बाद 338 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात भारतीय संघ 158 धावांवर गारद झाला. शादाबने पाकिस्तानसाठी 6 कसोटीत 14 विकेट्ससह 300 धावा, 48 एकदिवसीय सामन्यांमध्ये 62 विकेटसह 434 धावा आणि 64 टी-20 सामन्यात 73 बळी आणि 275 धावा केल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: David warner, Pakisatan, Rohit sharma, Virat kohli